लिंगायत समाजाचे आझाद मैदानात आंदोलन - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

लिंगायत समाजाचे आझाद मैदानात आंदोलन

Share This
मुंबई  / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.com) लिंगायत समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी लिंगायत समाज संघर्ष समितीतर्फे सोमवारी आझाद मैदानात धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी राज्यभरातून आलेल्या हजारो आंदोलनकर्त्यांनी जोरदार निदर्शने करत आझाद मैदान परिसर दणाणून सोडला. 
लिंगायत समाजास भाषिक अल्पसंख्याक दर्जा मिळावा, लिंगायत समाजाचा इतर मागासवर्गीयांमध्ये समावेश करावा, जगत्ज्योती महात्मे बसवेश्‍वर नावाने आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, लिंगायत समाज असलेल्या गावात स्मशानभूमीसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करावी आदी लिंगायत समाजाच्या मागण्या आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात लिंगायत समाजाची एकूण संख्या ९0 लाख इतकी आहे. राज्यभरातून आलेल्या हजारो आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्यांसाठी आझाद मैदानात निदर्शने करत महाराष्ट्र शासनाने आपल्या मागण्या मान्य न केल्यास राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात लिंगायत समाज बांधवांच्या वतीने आमरण उपोषण, स्थानिक लोकप्रतिनिधींना घेराव घालतील तसेच रास्ता रोको करून आंदोलन करतील, असा इशारा लिंगायत समाजाचे नेते ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे व सुनील रुकारी यांनी या वेळी दिला.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages