रेल्वेत र्जमन बनावटीचे एलएचबी डबे येणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

रेल्वेत र्जमन बनावटीचे एलएचबी डबे येणार

Share This
मुंबई  / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.com) देशातील रेल्वेमध्ये पर्यावरणपूरक, अग्निरोधक, अत्याधुनिक ब्रेक यंत्रणा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे वातानुकूलित असलेल्या नव्या डब्यांचा वापर करण्याचा निर्णय भारतीय रेल्वेने घेतला आहे. उन्हाळय़ात जास्त एसी कुलिंग अशी वैशिष्टे असणार्‍या या नव्या डब्यांच्या वापरास प्राधान्य देण्यात येणार आहे. नेहमीच्या पद्धतीच्या डब्यांऐवजी अत्याधुनिक र्जमन तंत्रज्ञानाने युक्त असणारे एलएचबी (लिंक हॉफमन बुश) डबे राजधानी एक्स्प्रेस, डबलडेकर, दुरान्तो अशा प्रमुख गाड्यांमध्ये वापरण्यात येणार आहेत. त्यानंतर टप्प्याटप्याने सर्व मेल-एक्स्प्रेस गाड्यांमध्ये त्याचा वापर करण्यात येणार आहे.
र्जमन तंत्रज्ञान असणारे एलएचबी डबे संपूर्ण भारतीय रेल्वे सेवेत येणार आहेत. काही काळापासून प्रायोगिक तत्त्वावर वापरण्यात येणार्‍या डब्यांचे महत्त्व लक्षात घेऊन या डब्यांची निर्मिती मोठय़ा प्रमाणात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या डब्यांची किंमत सुमारे दीड कोटी रुपये आहे. त्यात सुरक्षा प्रणालीवरही भर देण्यात आला आहे. या डब्यांमुळे गाड्यांचा वेग किमान १३0 किमी प्रतितासावरून १६0 किमी प्रतितासावर जाणार आहे. या डब्यांची रचना प्रामुख्याने स्टेनलेस स्टील आणि अँल्युमिनियमने केली आहे. त्यामुळे या डब्यांचे वजन यापूर्वीच्या डब्यांपेक्षा कमी असल्यामुळे गाड्यांचा वेग वाढण्यास मदत होणार आहे. गाड्यांचा वेग वाढताच ध्वनिप्रदूषण रोखण्यासही त्याची मदत होणार आहे. या पद्धतीच्या डब्यांमुळे यापूर्वीच्या १00 डेसिबलऐवजी ध्वनीची पातळी ६0 डेसिबल होणार आहे. अत्याधुनिक न्यूमिटॅक ब्रेकिंग व्यवस्था असल्याचा फायदा होणार आहे. देशातील कपूरतळा येथे या डब्यांची निर्मिती सुरू असून त्यात येत्या काळात वाढ केली जाणार आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages