डॉ. सत्यपाल सिंह यांच्या फ्लॅटमध्ये चालणारा कुंटणखाना उद्ध्वस्त - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

डॉ. सत्यपाल सिंह यांच्या फ्लॅटमध्ये चालणारा कुंटणखाना उद्ध्वस्त

Share This
मुंबई / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.comमुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि उत्तर प्रदेशातील बागपत लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर निवडून आलेले डॉ. सत्यपाल सिंह यांच्या मुंबईतील फ्लॅटवर समाजसेवा शाखेच्या अधिकार्‍यांनी छापा टाकून तेथे चालू असलेला कुंटणखाना उद्ध्वस्त केला. हा कुंटणखाना चालवणारा दलाल वकील राजू शहा याला अटक करून दोन मुलींची सुटका करण्यात आली आहे. या कुंटणखान्यातून पोलिसांनी चार हजारांचा रोख रक्कम हस्तगत केली असून पुढील तपासासाठी हे प्रकरण वर्सोवा पोलीस ठाण्याकडे हस्तांतरित करण्यात आले आहे. 
डॉ. सत्यपाल सिंह यांचा अंधेरी पश्‍चिम येथील पाटलीपुत्र हौसिंग सोसायटीमध्ये एक मोठा फ्लॅट असून तो त्यांनी इंडियाबुल या कंपनीला गेल्या तीन वर्षांपासून भाड्याने दिला होता. या सोसायटीच्या दहाव्या मजल्यावर असलेल्या या फ्लॅटमध्ये कुंटणखाना चालत असल्याची माहिती समाजसेवा शाखेच्या अधिकार्‍यांना मिळताच त्यांनी शनिवारी सायंकाळी सात वाजता सापळा रचून या फ्लॅटवर छापा टाकला असता तेथे कुंटणखाना चालत असल्याचे दिसून आले. त्या ठिकाणी दोन मुलीही सापडल्या. या दोन्ही मुली २0 ते २२ वर्षे वयोगटाच्या आहेत. त्यांची रवानगी महिला सुधारगृहात करण्यात आली आहे. वकील राजू शहा याला रविवारी सुटीकालीन न्यायालयात हजर केले असता त्याला मंगळवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

डॉ. सत्यपाल सिंह यांनी हा फ्लॅट आपला असून तो आपण इंडियाबुल कंपनीला भाड्याने दिला आहे, मात्र आपण गेल्या तीन वर्षांपासून या फ्लॅटमध्ये गेलोही नाही, असे सांगितले. मात्र पिटा कायद्यानुसार फ्लॅटधारकावरसुद्धा कारवाई होऊ शकते, असे एका अधिकार्‍याने सांगितले. त्यामुळे डॉ. सत्यपाल सिंह हे सुद्धा अडचणीत येण्याची शक्यता आहे. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी ओशिवरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सनदी अधिकार्‍यांच्या सोसायटीतील एका फ्लॅटवर छापा टाकून अंमली पदार्थांचा व्यवसाय करणार्‍या एका कुटुंबाला पोलिसांनी अटक केली होती. हा फ्लॅट बेस्टचे महाव्यवस्थापक गुप्ता यांच्या मालकीचा असल्याचे उघड झाले होते.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages