वांद्रे-कुर्ला रेल्वे लिंकची मागणी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

वांद्रे-कुर्ला रेल्वे लिंकची मागणी

Share This
मुंबई / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.com) शहरातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी वांद्रे-कुर्ला रेल्वे लिंकची मागणी उचलून धरली आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यापुढे हा मुद्दा मांडण्यात येणार असल्याचे कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. एमएमआरडीएच्या फेस-३ मध्ये वांद्रे ते कुर्ला रेल्वे लिंक उभारण्याची योजना होती. यासाठी जागतिक बँकेने आर्थिक सहाय्य पुढे केले होते. आगामी काळात या परिसरातून मेट्रोचा मार्ग जाणार आहे. त्यामुळे हा रेल्वे लिंक फायद्याचा ठरणार नाही. तसेच प्रवाशांचा प्रतिसादही कमी मिळू शकतो. त्यामुळे हा रेल्वे लिंक टाळण्यात आल्याचे समजते; परंतु काही सामाजिक कार्यकर्त्यांनी हा रेल्वे लिंक टाळणे योग्य नसल्याचे म्हटले आहे. मेट्रो शहरातील सर्व प्रवाशांचा भार उचलू शकत नाही. यासारख्या रेल्वे लिंकची गरज असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. एमएमआरडीएने हा प्रकल्प वगळू नये, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्त्याने सांगितले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages