मुंबई / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.com) मुंबई महापालिकेचे जे सफाई कामगार पालिकेच्या वसाहतीमध्ये राहत आहेत आणि त्या इमारती धोकादायक झाल्या आहेत अशा इमारतींमधील कामगारांना महापालिका जबरदस्तीने माहूल येथे स्थलांतरीत करण्याच्या नोटीसा देण्यात येते आहेत. हे स्थलांतर तात्काळ थांबवावे, अशी मागणी भाजपा आमदार विजय (भाई) गिरकर यांनी केली त्यावर आज राज्याचे नगर विकास राज्यमंत्री उदय सामंत यांनी हे स्थलांतर तात्काळ थांबविण्याचे निर्देश महापालिकेला दिले आहेत.
नागपूर अधिवेशनामध्ये आमदार भाई गिरकर यांनी 28हजार सफाई कामगारांच्या घरांचा प्रश्न मांडला होता.त्यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कामगारांचे स्थलांतर तात्काळ थांबविण्यात येईल. तसेच या घरांच्या पुर्नविकासासाठी आश्रय योजनेअंतर्गत महिन्याच्या आत चार एफएसआय देण्यात येईल अशी घोषणा केली होती.याबाबतचा ठराव महापालिकेमध्ये 27 डिसेंबर 2013 ला एक मतांने पारित केला असून तो राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे. राज्य शासनाने त्याला मंजूरी न दिल्यामुळे सफाई कामगारांच्या आश्रय योजनेचे काम रखडले आहे याकडे गिरकार यांनी राज्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. त्यावर हा प्रस्तावालाही सरकार लवकरच मंजूरी देईल, अशी ग्वाही राज्यमंत्री उदय सामंत यांनी दिली.
