नालेसफाईवरून शिवसेनेची नगरसेविका घसरली - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

नालेसफाईवरून शिवसेनेची नगरसेविका घसरली

Share This
मुंबई  / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.com) नालेसफाईच्या मुद्द्यावरून आज (ता. 11) स्थायी समितीच्या बैठकीत शिवसेनेच्या नगरसेविकेने शिवराळ भाषा वापरल्यामुळे तणाव निर्माण झाला; मात्र तिच्यासह सभागृह नेत्यांनीच माफी मागितल्यामुळे या वादावर पडदा पडला. 
नाल्यात झोपड्या असल्याने सफाईला अडचणी येत असल्याचा युक्तिवाद सभागृह नेत्या तृष्णा विश्‍वासराव यांनी केला. यावर 30 वर्षांपासून तुमची सत्ता आहे. झोपड्या का नाही हटवल्या, असा सवाल करत म्हणूनच तुम्हाला गुजरात मॉडेल घेऊन निवडणूक लढवायला लागली, असा टोला मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी लगावला. यावरून नेहमीप्रमाणे शिवसेना-मनसेत चांगलीच जुंपली. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू असताना "तुम्ही मग नाशिक मॉडेल घेऊन का नाही लढलात? सात वर्षांपासून बोलताय ती ब्लू प्रिंट कुठे आहे? असे प्रश्‍न उपस्थित करताना अचानक शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर यांनी शिवराळ शब्द वापरला. यामुळे काही काळ बैठकीत तणाव निर्माण झाला. सर्वच विरोधकांनी या भाषेवर नाराजी व्यक्त केली. पेडणेकर यांच्यासह विश्‍वासराव यांनीही तत्काळ माफी मागून यावर पडदा टाकला.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages