मुंबई / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.com) थकीत पाणीपट्टी वसूल करण्यासाठी महापालिकेने दोन टक्के अतिरिक्त आकार माफ करण्याची अभय योजना तयार केली आहे. तिला बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी मिळाली. मात्र, यामुळे सरकारी अस्थापनांकडील पाणीपट्टी वसूल होणार का असा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला.पालिकेने १६ जून ते १६ ऑगस्ट २०१४ या कालावधीत अभय योजना राबविण्याचे ठरवले आहे. पाण्याच्या बिलाची थकबाकी असलेल्या ग्राहकांना याचा फायदा घेता येणार आहे.
पालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या अभय योजनेमध्ये पाण्याच्या बिलाची थकबाकी असलेल्या ग्राहकांनी एक रकमी पैसे भरल्यास त्यांच्या बिलामधील लावलेला अतिरिक्त २ टक्के अतिरिक्त भार रद्द केला जाणार आहे. सन २००१ ते २०१४ या कालवधी मध्ये एकूण ११२८ कोटी रुपयांची थकबाकी असून यामध्ये ४४४ कोटी रुपयांचा अतिरिक्त भार आहे. ग्राहकांनी एक रकमी पाण्याचे बिल भरल्यास पालिकेला ७८४ कोटी रुपये यामधून मिळणार आहेत.
यामध्ये झोपडपट्टी मध्ये ५३४ कोटी रुपयांची थकबाकी असून २५४ कोटी रुपयांचा अतिरिक्त भार आहे. झोपडपट्टी नसलेल्या मध्ये १८१ कोटी रुपयांची थकबाकी असून ५५ कोटी रुपयांचा अतिरिक्त भार आहे. मध्य रेल्वेकडे ९६ कोटी रुपयांची थकबाकी असून त्यामध्ये ३५ कोटी रुपयांचा अतिरिक्त भार आहे. पश्चिम रेल्वेकडे १२२ कोटी रुपयांची थकबाकी असून ३८ कोटी रुपयांचा अतिरिक्त भार आहे.
सन २०१० मध्ये अभय योजने मधून २४६ कोटी रुपयांची थकबाकी असताना १२९ कोटी रुपये पालिकेने वसूल केले होते तर ११७ कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पालिकेने रद्द केला होता. दोन वर्षांपूर्वीही जाहीर केलेल्या अभय योजनेत एक हजार 559 कोटींची वसुली झाली नव्हती. यात राज्य व केंद्र सरकारच्या विभागांकडे सर्वात जास्त थकबाकी होती
