मुंबई / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.com) वांद्रे टर्मिनस येथून मालाची ने-आण करताना अनेक व्यापारी जकात चुकवतात. पालिका अधिकाऱ्यांच्या सहकार्यामुळेच त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचा आरोप प्रभाग क्रमांक 91 च्या कॉंग्रेस पक्षाच्या नगरसेविका व आरोग्य समितीच्या सदस्या डॉ. गुलिस्ता शेख यांनी केला आहे.
जकात चोरी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी नुकतीच त्यांनी करनिर्धारक व संकलक (दक्षता विभाग) यांच्या उपस्थितीत व पोलिसांच्या सोबत वांद्रे टर्मिनस येथे पहाटे 4 ते सकाळी 8 वाजेपर्यंत छापा घातला. या कारवाईदरम्यान जकात चुकवणारे ट्रक अडवण्यासाठी वांद्रे न्यायालयाजवळ नाकाबंदी करण्यात आली होती. आश्चर्याची बाब म्हणजे, या कालावधीत एकही मालवाहू ट्रक या रस्त्यावरून गेला नाही. त्यामुळे या छाप्याची पूर्वकल्पना व्यापाऱ्यांना दिली असावी, अशी शंका शेख यांनी व्यक्त केली.
एकही ट्रक येथून बाहेर जात नाही, तोपर्यंत 24 तास पाळत ठेवण्याची सूचना उप करनिर्धारक व संकलक सुनील बने यांना दिली होती. कर्मचारीवर्ग अपुरा असल्याने 24 तास पाळत ठेवण्यास त्यांनी असमर्थता दर्शवली. नियंत्रण कक्षाशी संपर्क साधल्यावर 24 तास पाळत ठेवण्यासाठी गाडी पाठवू नये, असे वरिष्ठांचे आदेश असल्याची माहिती तेथून देण्यात आली. त्यामुळे या सर्व प्रकाराला अधिकाऱ्यांचा आशीर्वाद असल्याची शंका येते, असे शेख म्हणाल्या. जकात चोरीमुळे महापालिकेचा कोट्यवधींचा महसूल बुडत आहे. हा महसूल बुडवणाऱ्यांवर येत्या 15 दिवसांत कठोर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.