मुंबईचा ओशोनोग्राफी सर्वे करा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबईचा ओशोनोग्राफी सर्वे करा

Share This
मुंबई  / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.com) 
मुंबईचा ओशोनोग्राफी सर्वे करूनच या पुढे बांधकामाना परवानगी देण्यात यावी अशी मागणी मुंबई भाजपा अध्यक्ष आम आशिष शेलार यांनी आज तात्काळ केद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करताना केली उद्या याबाबत ते मंत्र्यांना पत्र लिहीणार आहेत. समुद्राला उधाणाची भरती आल्यामुळे आज मुंबई अनेक भागात पाणी घुसले बांद्रा आणि खार परिसरालाही  फटका बसला आमदार शेलार यांनी संध्याकाळी तात्काळ बँन्डसँड; गणेशनगर आणि खार भागाला भेट देऊन परीस्थितीची पाहणी केली. दरम्यान त्यानंतर त्यांनी तात्काळ केद्रीय पर्यावरण मंत्र्यांना संपर्क साधून परिस्थिति ची माहीती देऊन सर्वेची मागणी केली राज्याने हा सर्वे करावा त्यासाठी केद्रीय पर्यावरण खात्याने मदत करावी असे त्यांचे म्हणने आहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages