समुद्र किनाऱ्यावर सेफ्टी गार्डची नियुक्ती - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

समुद्र किनाऱ्यावर सेफ्टी गार्डची नियुक्ती

Share This
मुंबई / अजेयकुमार जाधव / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.com
मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर पुढील पाच दिवस लाईफ सेफ्टी गार्ड नियुक्त करणार असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन विभागाद्वारे देण्यात आलेली आहे. नानौक नावाच्या वादळाचा फटका गुरुवारी मुंबईला बसून काही विभागांमध्ये पाणी साचले होते. तसेच पुढील पाच दिवस समुद्राला भारती असल्याने प्रत्येक समुद्र किनाऱ्यावर १५ लाईफ सेफ्टी गार्ड नियुक्त करण्यात येणार आहेत.  
जून महिन्यात १३ जूनला १२ वाजून ३२ मिनिटांनी ४.६० मीटर, १४ जूनला १ वाजून १७ मिनिटांनी ४.७६ मीटर, १५ जूनला २ वाजून ३ मिनिटांनी ४.८५ मीटर, १६ जूनला २ वाजून ५० मिनिटांनी ४. ८५ मीटर, १७ जूनला ३ वाजून ३६ मिनिटांनी ४. ७४ मीटर, तर १८ जूनला ४ वाजून २३ मिनिटांनी ४.५५ मीटर उंचीच्या लाटा समुद्रामध्ये येणार आहेत. यामुळे यावेळी मुंबईकर नागरिकांनी समुद्रामध्ये जाऊ नये असे आवाहन पालिकेने केले आहे. समुद्र किनारी लाईफ गार्ड बरोबर एक आम्बूलंस, पोलिस, फायर ब्रिगेडचे जवान तसेच एनडीआरएफचे जवान सकाळी १० पासून सायकली ६ पर्यंत तैनात करण्यात येणार असल्याचे आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे महेश नार्वेकर यांनी सांगितले आहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages