मुंबई / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.com) फेसबुक तसेच व्हॉट्सअपवरील महापुरुषांबाबतच्या आक्षेपार्ह मजकुरामुळे राज्यात निर्माण होत असलेला जातीय तणाव तसेच पुण्यातील फेसबुकप्रकरणी केंद्र सरकारने राज्य सरकारचा अहवाल फेटाळल्यानंतर आता राज्य सरकार नव्याने कामाला लागले आहे. फेसबुक आणि व्हॉट्सअपवर आक्षेपार्ह मजूकर टाकणारे आणि तो लाईक करणार्या दोघांवरही गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिली.
फेसबुकवरील महापुरुषांबाबतच्या आक्षेपार्ह मजकुराच्या घटनेनंतर पुण्यातील हडपसर भागामध्ये हिंदू राष्ट्र सेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. हिंदू राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांनी मोहसीन शेख या आयटी इंजिनीयरला मारहाण केल्यानंतर त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी केंद्र सरकारने राज्य सरकारचा अहवाल फेटाळल्यानंतर आता राज्य सरकार नव्याने कामाला लागले आहे. मोहसीन शेख हा पूर्णपणे निर्दोष असून कोणत्याही परिस्थितीत पोलिसांना कायदा-सुव्यवस्था राखण्याचे आदेश देण्यात आल्याचे आबांनी या वेळी स्पष्ट केले आहे. दरम्यान, मोहसीन शेख हा पूर्णपणे निर्दोष असल्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी स्पष्ट केले असून राज्यात पोलिसांना कायदा-सुव्यवस्था राखण्याचे आदेश दिले आहेत. तसेच यापुढे फेसबुक-व्हॉट्सअपवर आक्षेपार्ह मजकूर टाकल्यास आणि तो मजकूर लाईक केल्यासही गुन्हा ठरेल, असेही पाटील म्हणाले. या प्रकरणी पोलिसांनी नुकतीच प्रतिक पंडित सागले (२0) आणि प्रसाद बाळासाहेब पानसरे (२२) या दोघांना भेक्रेनगर, फुरसुंगी येथून अटक केली आहे. यापूर्वी हिंदू राष्ट्र सेनेच्या १७ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी दोघेजण अल्पवयीन आहेत. या संपूर्ण घटनेचा आढावा घेण्यासाठी राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष मुनाफ हकीम यांनी पुण्याला भेट दिली होती. दरम्यान, या प्रकरणातील आरोपी धनंजय देसाई आणि त्यांच्या हिंदू राष्ट्र सेनेवर बंदी घालण्याची शक्यताही राज्य सरकार तपासून पाहत आहे.