मुंबई/ अजेयकुमार जाधव / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.com)
मोटार वाहन दावा न्यायाधीकारणाकडे बेस्टच्या बसमुळे झालेल्या दुखापत व मृत्यू झालेल्या अपघाताची दावे चालवले जातात. या दाव्यापैकी ६४ प्रकरणे नुकत्याच झालेल्या महालोक अदालती मध्ये निकाली काढण्यात आली आहेत. या महालोक अदालतीमध्ये ९२ प्रकरणे चर्चेकरिता घेण्यात आली होती. यामधील ६४ प्रकरणात सामोपचाराने तोडगा काढण्यात आला. या ६४ प्रकरणात १ करोड ८५ लाख २५ हजार रुपयांचा दावा करण्यात आला होता यापैकी दावा कारणाऱ्याना ८५ लाख ३८ हजार ५०० रुपये देण्यात येणार आहेत. दावा करण्यात आलेल्या रकमेपैकी देण्यात येणारी रक्कम हि फक्त ४६ टक्के असून बेस्टचे १ कोटी रुपये वाचले असल्याची माहिती बेस्ट समिती पुढे सादर करणात आली आहे.
