मोबाईलवरून भरा मुंबई पालिकेचे कर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मोबाईलवरून भरा मुंबई पालिकेचे कर

Share This
मुंबई  / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.com) नागरिकांसाठी पुरवल्या जाणार्‍या सेवांना गती देण्याचा निर्णय बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाने घेतला आहे. प्रशासनाच्या नव्या धोरणामुळे नजीकच्या काही दिवसांतच मुंबईकर आपल्या विविध बिलांची रक्कम 'मोबाईल अँप'च्या माध्यमातून भरणा करू शकणार आहेत. 

अनिल गलगली यांनी पालिकेच्या माहिती-तंत्रज्ञान शाखेकडे अर्ज करून अद्ययावत सुविधांच्या अंमलबजावणीबाबत विचारणा केली होती. त्यावर माहिती-तंत्रज्ञान शाखेचे संचालक महेश नार्वेकर यांनी उत्तर दिले आहे. पालिका प्रशासनाच्या नव्या धोरणानुसार नागरिकांना 'मोबाईल अँप'च्या माध्यमातून सर्व देयके भरणे शक्य होणार आहे. पाणी बिल, मालमत्ता कर, दुकाने नूतनीकरण आदींची रक्कम 'मोबाईल अँप'द्वारे भरता येईल, असे नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे. 'नेट बँकिंग'च्या माध्यमातून देयके भरू इच्छिणार्‍यांना ५00 रुपयांपर्यंत ५ रुपये तर ५00 रुपयांपुढील रकमेवर १0 रुपये शुल्क द्यावे लागणार आहे. 

तसेच डेबिट कार्डचा वापर करणार्‍या नागरिकांना २000 पर्यंतच्या व्यवहारात त्या रकमेपैकी 0.७५ टक्के तर २000 वरील रकमेवर १ टक्के अतिरिक्त शुल्क भरणा करावे लागणार आहे. या सेवांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना पालिका प्रशासनाच्या संकेतस्थळावरून अँप डाऊनलोड करावे लागणार आहे. 

पालिका मोबाईल सेवा सुरू करणार आहे; मात्र सध्याचे नागरी सेवा केंद्र खासगी कंपन्यांना चालविण्यात देण्यात आले आहे. त्यातून महापालिकेचा लाखोंचा महसूल खासगी कंपनीला मिळत आहे. ही पद्धत तत्काळ बंद करण्यासाठी गलगली यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांना पत्र लिहिले आहे. या नागरी सेवा केंद्रांना परवानगी देणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages