लाटांचा थरार अनुभवताना एकाचा मृत्यू - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 June 2014

लाटांचा थरार अनुभवताना एकाचा मृत्यू

मुंबई  / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.comमरीन ड्राईव्हच्या समुद्रात उसळणाऱ्या महाकाय लाटांचा थरार अनुभवण्यासाठी कठड्याला लागून असलेल्या कॉंक्रीटच्या त्रिकोणी ठोकळ्यांत फोटो काढायला उतरलेल्या दोन भावांपैकी एकाचा लाटांच्या तडाख्यामुळे समुद्रात बुडून मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार आज दुपारी घडला. अग्निशमन दलाच्या जवानांनी एकाला सुखरूप वाचविले. रतन भीमा चव्हाण (वय 19) असे या लाटांच्या तडाख्यामुळे समुद्रात बुडालेल्या तरुणाचे नाव आहे.
डोंबिवलीचा राहणारा रतन त्याचा लहान भाऊ चेतन (17) याच्यासोबत सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास मरीन ड्राईव्हच्या समुद्रकिनाऱ्यावर आला. तीन दिवसांपासून समुद्रात उंचच उंच लाटा उसळत असल्याने तो थरार अनुभवण्यासाठी दोघेही समुद्रकिनारी ठेवलेल्या त्रिकोणी ठोकळ्यांमध्ये उतरले. या लाटांनी काही क्षणांतच रौद्र रूप धारण केले. लाटांच्या तडाख्यामुळे दोघेही या त्रिकोणी ठोकळ्यांमध्ये अडकले. उसळत्या लाटांच्या आवाजात या दोघांचे आवाज दबले गेले. पुढच्याच क्षणी आलेल्या लाटेच्या एका मोठ्या तडाख्यात रतन वाहून गेला. 

या घटनेचे गांभीर्य लक्षात येताच काही प्रत्यक्षदर्शींनी या घटनेची माहिती पोलिस आणि अग्निशमन दलाला दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी ठोकळ्यांमध्ये अडकलेल्या चेतनला बाहेर काढले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी समुद्रात रेस्क्‍यू ऑपरेशन सुरू करून बुडालेल्या रतनचा शोध घेतला. काही मिनिटांतच बेशुद्धावस्थेतील रतन जवानांच्या हाती लागला. त्याला तातडीने जी. टी. रुग्णालयात दाखल करण्यात आले; पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

Post Bottom Ad

JPN NEWS