कुमारी मातांचे खटले फास्ट ट्रक न्यायालयात चालवणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

कुमारी मातांचे खटले फास्ट ट्रक न्यायालयात चालवणार

Share This
मुंबई  / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.com) आदिवासी कुमारी माता यांचे जे गुन्हे न्यायप्रविष्ठ आहेत ते फास्ट ट्रक न्यायालयात चालविले जातील. असेच अशा कुमारी मातांना सरकारच्या योजनांचे फायदे देऊन पुर्नवसन केले जाईल, अशी ग्वाही गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी आज विधान परिषदेत दिली. याबाबत भाजपा आमदार ऍड  आशिष शेलार यांनी तारांकित प्रश्न विचारला होता.

यवतमाळ येथे 117 कुमारी माता असल्याचे आढळून आले आहे. यातील तीघीनी तक्रार केली असून त्यांचे गुन्हे न्यायप्रविष्ठ आहेत, अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली. यातील एक गुन्हा 22 नोव्हेंबर 2002 मध्ये दाखल झाला या प्रकरणी 7 मार्च 2003 रोजी आरोपींवर चार्टशिट फाईल करण्यात आली. हे प्रकरण आजही न्यायप्रविष्ठ आहे, अशी माहिती लेखी उत्तरात त्यांनी दिली.. हा गुन्हा तब्बल 12 वर्षे, तर दुसरा गुन्हा 3 वर्षे प्रलंबित आहेत याडे लक्ष वेधित आमदार आशिष शेलार यांनी ही बाब गंभीर असून अशा घटना अत्यंत संवेदनशिल असून त्यांना तात्काळ न्याय मिळण्याची गरज आहे. 

त्यामुळे हे खटले फास्ट ट्रक न्यायालयात वर्ग करण्यात  यावे तसेच अशा महिलांचे पुर्नवसन सरकारतर्पे€ करण्यात यावे, अशी मागणी आमदार शेलार यांनी उपप्रश्नाव्दारे केली. या भागात काही कंत्राटदार, व बाहेरी राज्यातील व्यापारी आदिवाशी मुलींच्या गरिबेचे शोषण करीत असल्याकडेही आमदार शोभा फडणविस आणि आम. शेलार यांनी लक्ष वेधून अशा मुली भितीपोटी तक्रार करायला पुढे येत नाहीत याकडे गृहमंत्र्यांचे त्यांनी लक्ष वेधले. त्यावर उत्तर देताना गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सांगितले की, अशा प्रकारे कोणी शोषण करीत असेल तर पोलिस यंत्रणा त्याची तात्काळ दखल घेईल. तसेच या मुलींचे सर्व खटले फास्ट ट्रक न्यायालयात चालविण्यात येतील आणि त्या मुलीच्या पुर्नवसनासाठी सरकारच्या विविध योजनांमध्ये त्यांना सामावून घेण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages