वर्षभरात साडेतीन कोटींचे अंमली पदार्थ मुंबईत जप्त - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 June 2014

वर्षभरात साडेतीन कोटींचे अंमली पदार्थ मुंबईत जप्त

मुंबई  / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.comशहरात अंमली पदार्थांच्या तस्करीत वाढ झाली आहे. पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने वर्षभरात केलेल्या कारवाईत तीन कोटी 67 लाखांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले असल्याची माहिती गृहविभागातर्फे देण्यात आली. 
कॉंग्रेसचे आमदार बाबा सिद्दीकी यांनी विधानसभेत तारांकित प्रश्नाद्वारे विचारलेल्या लेखी प्रश्नावर गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी ही माहिती लेखी स्वरूपात दिली. त्यानुसार या पथकाने 2013 मध्ये दाखल केलेल्या एक हजार 466 गुन्ह्यांत 3 कोटी 67 लाखांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आल्याचे 2014 मध्ये निदर्शनास आले. 2012 मध्ये 543 गुन्ह्यांमध्ये 14 कोटी 55 लाख 67 हजार 210 किमतीचे अंमली पदार्थ; तसेच 2013 मध्ये 520 गुन्ह्यांमध्ये तीन कोटी 47 लाख 78 हजारांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.

Post Bottom Ad

JPN NEWS