पावसाळ्यात मंडपात तरी राहू द्या... - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 June 2014

पावसाळ्यात मंडपात तरी राहू द्या...

मुंबई  / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.comकॅम्पा कोलातील बेकायदा घरे वाचवण्याच्या सर्व अपेक्षा संपल्यानंतर आता बेकायदा घातलेला मंडप वाचवण्यासाठी रहिवाशांनी प्रयत्न सुरू केले आहेत. हा मंडप पाडून टाकण्याची नोटीस महापालिकेने बजावली असतानाही ही कारवाई करू नये, असे पत्र रहिवाशांनी प्रशासनाला दिले आहे. 
सर्वोच्च न्यायालयाने कॅम्पा कोला संकुलातील बेकायदा घरांवर कारवाई करण्याचा निर्णय कायम ठेवल्यानंतर काही रहिवाशांनी घरे रिकामी करण्यास सुरुवात केली आहे. घरे रिकामी केली असली तरी संकुल सोडून न जाता महापालिकेच्या कारवाईला विरोध करण्याचा निर्णय रहिवाशांनी घेतला आहे. त्यासाठी संकुलात मोठा मंडप उभारण्याचे काम सुरू आहे. हा मंडपही महापालिकेने बेकायदा ठरवला असून तो 24 तासांत हटवण्याची नोटीस कॅम्पा कोलाला देण्यात आली आहे. 24 तासांत मंडप न हटविल्यास पालिका कारवाई करेल, असा इशारा देण्यात आला आहे. 

महापालिकेची ही नोटीस मिळताच हा मंडप वाचवण्यासाठी रहिवाशांनी हालचाली सुरू केल्या आहेत. महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांना पत्र पाठवून किमान पावसाळ्यात कारवाई करू नये, अशी विनंती रहिवाशांनी केली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS