नोकरीचे प्रलोभन दाखवून कुर्ल्यात तरुणीवर बलात्कार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 June 2014

नोकरीचे प्रलोभन दाखवून कुर्ल्यात तरुणीवर बलात्कार

मुंबई  / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.comब्युटी पार्लरमध्ये नोकरी लावण्याचे प्रलोभन दाखवून तरुणीवर कुर्ला येथे झालेल्या बलात्कारप्रकरणी तीन रिक्षाचालक व एका महिलेला ट्रॉम्बे पोलिसांनी अटक केली. तरुणीच्या असहायतेचा फायदा घेत रिक्षाचालकांपैकी एकाने मित्राच्या खोलीवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला. तिच्यावर घाटकोपरमध्ये राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 
चिता कॅम्प ते कुर्ला रेल्वे स्थानकादरम्यान गुरुवारी (ता. 5) पहाटे हा धक्कादायक प्रकार घडला. चिता कॅम्प परिसरात राहणाऱ्या या तरुणीने ब्युटी पार्लरचा कोर्स पूर्ण केला होता. ब्युटी पार्लरमध्ये नोकरीला लावण्याच्या बहाण्याने तिच्या ओळखीच्या नसीमबानू खान या तरुणीने तिला कुर्ला येथे येण्यास सांगितले. त्यानुसार ती नसीमबानूसोबत कुर्ला येथे गेली. तिथे नसीमबानूने तिचे रिक्षाचालक साथादार आमिर आणि फारूख नोकरी मिळण्यासाठी मदत करतील, अशी थाप मारली. या दोघांची तरुणीशी भेट घडवून आणल्यावर नसीमबानू तेथून निघाली. 

रिक्षाचालकांसोबत रात्री उशिरापर्यंत थांबल्यानंतर आमिर अन्वर खान या तरुणाने पीडित तरुणीला जवळच राहणाऱ्या "भाईजान‘ या रिक्षाचालक मित्राच्या खोलीवर नेले. या खोलीच्या गॅलरीत नेऊन त्याने तिच्यावर बलात्कार केला. गुरुवारी (ता. 5) पहाटे पाचच्या सुमारास ही तरुणी आरोपींच्या तावडीतून निसटली. घरी पोहचल्यावर तिने घडलेला प्रकार आईला सांगितला. ट्रॉम्बे पोलिस ठाण्यात या प्रकरणी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आमिर अन्वर खान, त्याचा साथीदार फारूक शेख, दीपक पाटील आणि पीडित तरुणीच्या ओळखीची महिला नसीमबानू हिला अटक केली. 

Post Bottom Ad

JPN NEWS