मुंबई / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.com) कॅम्पा कोला संकुलातील रहिवाशी विनोद कोठारी यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार होणार असल्याने महानगर पालिकेने कारवाई पुढे ढकलली आहे.कॅम्पा कोलातील रहिवाशांनी आज महानगर पालिका आयुक्तांची भेट घेऊन कारवाई पुढे ढकलण्याची मागणी केली होती,त्यानंतर आज होणारी कारवाई शुक्रवारी(ता.20)रोजी करण्याचा निर्णय महानगर पालिकेने घेतला आहे.
कॅम्पा कोला संकुलात राहाणाऱ्या विनोद कोठारी यांचे काल(ता.15)निधन झाले,त्यांचा मुलगा अमेरीकेतून येणार असल्याने त्यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.त्यातच बेकायदा घरावर महानगर पालिकेची कारवाई उद्या पासून सुरु होणार होती.त्यामुळे ही कारवाई पुढे ढकलण्याची मागणी काही रहिवाशांनी आज पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांची भेट घेऊन केली.त्यांची मागणी आयुक्तांनी मंजूर केली असून ही कारवाई शुक्रवारी करण्यात येणार आहे.कोठारी यांच्यासह 8 जून रोजी या संकुलातील चक्रवर्ती चावला यांचे निधन झाले होते.चावला आणि कोठारी या दोघांची घरे बेकायदा आहे.मात्र,या दोघांच्या घरावर शुक्रवारी कारवाई न करण्याचा निर्णय महानगर पालिकेने घेतला असल्याचे अतिरीक्त आयुक्त मोहन अडताणी यांनी सांगितले.
तंबूवरही कारवाई
कॅम्पा कोला संकुलात बांधण्यात आलेला तंबू हा पावसाळी शेड नसून तोही बेकायदा आहे.त्यामुळे त्याच्यावरही कारवाई होईल.या तंबूत जर पाणीजोडणी घेतली असेल तर त्यावरही कारवाई करण्यात येणार असल्याचे पालिकेच्या वरीष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.