दीपमाला सोनावणे यांना मुख्यमंत्री निधीमधून दोन लाख रुपये आर्थिक सहाय्य - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

दीपमाला सोनावणे यांना मुख्यमंत्री निधीमधून दोन लाख रुपये आर्थिक सहाय्य

Share This
मुंबई  / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.comदीपमाला सोनावणे या बसवाहक महिलेला कामावर असताना मारहाण करण्यात आली होती. या महिलेला मुख्यमंत्री निधीमधून दोन लाख रुपये आर्थिक सहाय्य म्हणून दिले असल्याचे महिला व बाल विकास मंत्री वर्षा गायकवाड यांनी कळविले आहे. 


दिपमाला सोनवणे, बसवाहक हया दिनांक 04-06-2014 रोजी सकाळी 08.00 ते 08.45 वा. दरम्यान कल्याण ते पनवेल मार्गावर (सोनारपाडा बसस्थानक) येथे कामावर असतांना त्यांना प्रवासी अभिषेक सिंग यांनी जबर मारहान केली. सदर मारहानीत त्या गंभीर जखमी झाल्यामुळे छाया रुग्णालयात तात्काळ दाखल करण्यात आले. मारहानी नंतर श्रीमती सोनवणे यांनी मानापाडा पोलीस स्टेशन मध्ये दिनांक 04-06-2014 रोजी सी.आर.286/14 अन्वये गुन्हा दाखल केला व तद्नंतर सेंट्रल हॉस्पिटल नं.3, उल्हासनगर येथे दाखल होत्या. 

त्यानंतर वर्षा गायकवाड, मंत्री, महिला व बालविकास यांनी मुख्यमंत्र्यांना दिपमाला सोनवणे यांस मुख्यमंत्री निधीतून रुपये 02.00 लक्ष ची आर्थिक मदत करण्याबाबत विनंती केली व सततचा पाठपुरावा केला होता. त्यानुसार मुख्यमंत्री महोदयांनी मानवतावादी दृष्टीकोनातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून रु.02.00 लक्ष मंजूर केलेले आहे व सदराचा निधी जिल्हाधिकारी, ठाणे यांच्याकडे पाठविण्यात आलेला असून त्यांनी  हि मदत पिडीत दिपमाला सोनवणे यांना तात्काळ देण्याबाबत कळविण्यात आले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages