मद्यपान करून कामावर येणार्‍या रेल्वे कर्मचार्‍यांची खैर नाही - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मद्यपान करून कामावर येणार्‍या रेल्वे कर्मचार्‍यांची खैर नाही

Share This
मुंबई / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.comमद्यपान करून कामावर जाणार्‍यांची संख्या काही कमी नाही; परंतु अशा मद्यपान करून कामावर जाणार्‍या कर्मचार्‍यांना चांगला धडा शिकवण्यासाठी रेल्वे प्रशानाने नवन नियम बनवले आहेत. त्यामुळे मद्यपान करून कामावर येणार्‍या रेल्वेच्या कर्मचार्‍यांची आता काही खैर नाही. रेल्वे बोर्डाने नशा विरोधी नीतीमध्ये संशोधन करत मद्यपान करून कामावर येणार्‍या रेल्वे कर्मचार्‍यांना बडतर्फ करण्याचा नियम केला आहे.
रेल्वे बोर्डाने मद्यपान करून कामावर येणार्‍या कर्मचार्‍याविरोधी कडक धोरण राबवण्यास सुरुवात केली आहे. नियमानुसार ज्या कर्मचार्‍यांच्या १00 एमएल रक्तामध्ये २१ एमएल किंवा त्यापेक्षा जास्त अल्कोहोलची मात्रा आढळून आली तर त्या कर्मचार्‍याला बडतर्फ करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ऑन ड्युटी असणार्‍या कर्मचार्‍याच्या १00 एमएल रक्तामध्ये २0 एमएल अल्कोहोल आढळून आले तरी त्याच्या सर्व्हिस रेकॉर्डमध्ये त्याची नोंद करण्यात येणार आहे. दुसर्‍या वेळेस जर तो कर्मचारी दोषी आढळला तर त्याला कामावरून निलंबित करण्यात येणार आहे. रेल्वेच्या संशोधित नियमामध्ये रेल्वे कर्मचार्‍यांनी दोन श्रेणींमध्ये विभागण्यात आले आहे.

पहिल्या श्रेणीमध्ये ट्रेन ऑपरेशन (परिचालन)शी संबंधित कर्मचार्‍यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये चालक, सहाय्यक चालक, गार्ड, स्टेशन मास्तर, सहाय्यक स्टेशन मास्तर, यार्ड स्टाफ, पॉईटं्स मॅन, कॅबिन मॅन, स्विच मॅन आणि लीव्हर मॅनचा समावेश आहे. तर दुसर्‍या श्रेणीमध्ये मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, कर्मशियल (टीसी-क्लार्क), आरपीएफ आणि पेण्ट्री कारच्या कर्मचार्‍यांचा समावेश आहे. रेल्वेच्या संशोधित नियमामध्ये रेल्वे कर्मचार्‍यांच्या श्रेणींनुसार त्यांच्या शिक्षा ठरवण्यात आल्या आहेत. पहिल्या श्रेणीमधील कर्मचार्‍यांच्या १00 एमएल रक्तामध्ये २0 एमएल अल्कोहोल आढळले तर त्यांना वॉर्निंग देऊन सोडण्यात येते; परंतु त्याची नोंद त्याच्या सवर्ि्हस बुकमध्ये करण्यात येते. जर तोच कर्मचारी दुसर्‍यांदा सापडला तर त्याला कामावरून बडतर्फ करण्यात येते. तर दुसर्‍या श्रेणीमधील कर्मचार्‍याला ५00 रुपयांपर्यंत दंड घेतला जातो किंवा एक वर्षाची शिक्षा अथवा दोन्ही शिक्षा दिल्या जातात.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages