मुंबई / अजेयकुमार जाधव / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.com)
वरळी येथील अनधिकृत क्याम्पाकोलावर येत्या १७ जून पासून पालिका कारवाही करेल अशी माहिती अतिरिक्त आयुक्त मोहन अडतानी यांनी दिली आहे. क्याम्पाकोलामधील काही मजले अनधिकृत ठरवून हे मजले खाली करण्याची नोटीस पालिकेने दिली होती. क्याम्पाकोलावासीय या नोटीसी विरोधात सर्वोच्च न्यायालयात गेले होते. न्यायालयाने पालिकेच्या बाजूने निकाल दिल्याने क्याम्पाकोलावर कारवाही होणार हे नक्की झाले होते. पालिकेने सोमवारी येथील रहिवाश्यांना ७२ तासांची नोटीस दिली होती या नोटीसीची मुदत आज गुरुवारी सायंकाळी संपली आहे. याबाबत अडतानी यांनी येथील अनधिकृत रहिवाश्यांना ४८८ कलमा नुसार पालिका नोटीस देणार आहे. या नोटीसी नंतर १७ जून पासून अनधिकृत मजले पडण्याची कारवाही सुरु होईल असे सांगितले आहे.

