मुंबई / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.com) सोशल मीडियावरून छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची बदनामीचे प्रकरण शनिवारी रात्री उशिरा उघडकीस आल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. ठाणे, नवी मुंबई, पुणे, पश्चिम महाराष्ट्र , मराठवाडा, कोकणासह राज्यात अनेक ठिकाणी संतप्त शिवसैनिकांनी रविवारी निदर्शने केली. याप्रकरणी राज्यातील जनतेने शांतता राखावी, असे आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांनी केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आणि दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची बदनामी करणारा मजकूर आणि फोटो फेसबुकवर प्रसिद्ध झाल्याची माहिती शिवसेनेचे कार्यकर्ते अविनाश बांगल यांना शनिवारी रात्री मिळाल्यानंतर त्यांनी मुलुंड पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या सायबर सेलची मदत घेऊन फेसबुकवरील सर्व आक्षेपार्ह मजकूर हटवण्यात आला. त्यानंतर पुन्हा अज्ञात व्यक्तीने फेसबुकवर नवे अकाऊंट निर्माण करून हा मजकूर नव्याने पोस्ट केला. पोलिसांनी तातडीने हे अकाऊंट डिलिट केले.
या घटनेचे पडसाद राज्यभर उमटत होते. ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा शिळ डायघर येथे शनिवारी रात्री संतप्त जमावाने केलेल्या दगडफेकीत खासगी बस, एसटी आणि बाईकचे किरकोळ नुकसान झाले. त्यासंदर्भात २०० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. नवी मुंबईतही संतप्त शिवसैनिकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी वाशी, नेरूळ, घणसोली, ऐरोली येथे निदर्शने केली.
पुण्यात रविवारी दुपारी काहीजणांनी दमदाटी करत शहरातील दुकाने बंद केली. पीएमपी-एसटी बस गाड्यांवर दगडफेक केली. या घटनेमुळे जनजीवन विस्कळित झाले होते. पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह उपनगर आणि जिल्ह्यातही या आंदोलनाचे पडसाद उमटले. कोकणातही अनेक ठिकाणी शिवसैनिकांनी बंद पुकारला होता. चिपळूण शहरात बंददरम्यान दोन गटांनी एकमेकांच्याविरोधात केलेल्या घोषणाबाजीमुळे शहरात तणावाचे वातावरण होते. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने परिस्थिती फार चिघळली नाही.
चिपळूण शहरात रविवारी सकाळी दहा वाजता शिवसैनिकांनी बाजारपेठेत बंद ची हाक देत मोर्चा काढला होता. तर यावेळी दुसऱ्या एका गटाने गोवळकोट येथील रस्त्यावर घोषणा देत टायर जाळले. पोलिसांनी हस्तक्षेप लाठीमार करून दोन्ही गटांना पांगवले.