वृक्ष छाटणीची कामे नियुक्त केलेल्या कंत्राटदाराकडूनच करुन घ्यावीत - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

वृक्ष छाटणीची कामे नियुक्त केलेल्या कंत्राटदाराकडूनच करुन घ्यावीत

Share This
मुंबई / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.comपावसाळ्याच्या दिवसांत मुंबईकर नागरिकांनी आपल्या सोसायटीतील वृक्षांची छटाई व कापणी खासगी कंत्राटदारामार्फत न करता बृहन्मुंबई महापालिकेने नियुक्त केलेल्या अधिकृत कंत्राटदाराकडूनच करुन घ्यावीत, असे आवाहन महापालिका प्रशासनाने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. 


महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्षांचे संरक्षण व संवर्धन वृक्ष प्राधिकरण अधिनियम १९७५ कायद्यांतर्गत असलेली विविध कामे वृक्ष प्राधिकरणाच्या माध्यमातून महानगरपालिका करीत असते. विशेषकरुन वृक्षांच्या संवर्धनासाठी पावसाळ्यापूर्वी वृक्षांच्या फांद्यांची छाटणी, संतुलित करणे इत्यादी कामे केली जातात. अशाच प्रकारच्या कामांची खासगी जमिनीवर असलेल्या वृक्षांसाठी आवश्यकता आहे. परंतु योग्य ती यंत्रणा उपलब्ध नसल्यामुळे असे आढळून येते की, सदर कामे तांत्रिक पद्धतीने योग्य होत नाही. याचा विचार करता यावर्षी पासून महापालिकेतर्फे खासगी क्षेत्रातही पुढील प्रकारची कामे करण्याकरीता कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

यामध्ये प्रामुख्याने मृत असलेल्या झाडांचे निर्मुलन, धोकादायक असलेल्या झाडांचे निर्मुलन, अनावश्यक असलेल्या फांद्यांचे निर्मुलन, फळे व झावळ्या काढणे, उन्मळून पडलेल्या झाडांची विल्हेवाट लावणे, झाडांचे पुनर्रोपण करणे, झाडांच्या ढोली व पोकळ्या भरण, झाडांचा तोल सुस्थितीत आणणे व झाडांची मुळे / खोड तसेच पानांवर कीटकनाशकांची फवारण करणे या कामांचा समावेश आहे. या सेवा घेण्यासाठी पालिकेमार्फत सविस्तर कार्यप्रणाली ठरविण्यात आलेली आहे. 

यानुसार संबंधित खासगी व्यक्तिने विभाग कार्यालयातील उद्यान खात्यामध्ये अर्ज करावयाचा आहे. या अर्जानुसार उद्यान खात्यातील अधिकारी संबंधित झाडांची पाहणी करतील व आवश्यक असलेल्या कामाच्या दरानुसार चलन बनवून संबंधित खासगी व्यक्तिस देतील. या चलनानुसारआवश्यक ते शुल्क विभाग कार्यालयात जमा केल्यावर पुढील ७ दिवसांत महानगरपालिकेने नेमलेल्या कंत्राटदारामार्फत नमूद केलेली कामे केली जातील. सविस्तर माहितीसाठी नागरिकांनी खालील नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावाः- 

विभाग दूरध्वनी क्रमांक विभाग दूरध्वनी क्रमांक
ए २२६२ ४०००                    के/पश्चिम २६२३ ४०००
बी २३७९ ४०००                   पी/दक्षिण २८७२ ७०००
सी २२०१ ४०००                    पी/उत्तर २८८२ ६०००
डी २३८६ ४०००                    आर/दक्षिण २८०५ ४७८८
ई २३०१ ४०००                      आर/उत्तर २८९३ ६०००
एफ/दक्षिण २४१० ३०००      आर/मध्य २८९३ ११८८
एन २४०८ ४०००                  एल २६५० ५१०९
जी/दक्षिण २४२२ ४०००       एम/पूर्व २५५५ ८७८९
जी/उत्तर २४३९७८८८/२४२१ २७७८   एम/पश्चिम २५२८ ४०००
एच/पूर्व २६११ ४०००             एन २५०१ ४०००
एच/पश्चिम २६४४ ४०००       एस २५९५ ४०००
के/पूर्व २६८४ ७०००               टी २५६९ ४०००

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages