मान्सून वेळेत ? - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मान्सून वेळेत ?

Share This
नवी दिल्ली : यंदा लांबणारा मान्सून नैऋत्य मोसमी वार्‍यातील बदलामुळे अपेक्षित वेळापत्रकानुसार बरसण्याची चिन्हे आहेत. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्टय़ाचा अडथळा दूर झाल्याने मान्सून त्याच्या नियोजित वेळेनुसार पुढील २४ तासांत (सोमवारपर्यंत) केरळात दाखल होईल, असा अंदाज हवमान खात्याने वर्तवला आहे. मान्सूनचा देशातील प्रवास अपेक्षेप्रमाणे सुरू झाल्यास महाराष्ट्रात ७ जूनच्या आसपास तो बरसेल. यापूर्वी तो १0 जूननंतर राज्यात दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. दिल्लीतील हवामान खात्याचे अधिकारी बी. पी. यादव यांनी सांगितले की, बंगालच्या उपसागरावर जास्त दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे जून महिन्यात तरी समाधानकारक पाऊस पडेल. परंतु 'अल-निनो'मुळे पुढील दोन महिन्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस पडू शकतो.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages