लल्लूभाई कम्पाऊंड पुनर्वसन कामात आर्थिक घोटाळा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

लल्लूभाई कम्पाऊंड पुनर्वसन कामात आर्थिक घोटाळा

Share This
मुंबई : प्रकल्पबाधित रहिवाशांना पुनर्वसनाच्या नावाखाली मानखुर्द येथील ट्रान्झिट कॅम्पमध्ये स्थलांतरित करण्यात आले. येथील नागरिक गेल्या १४ वर्षांपासून त्यांच्या हक्काच्या घरांसाठी प्रयत्न करत असून, त्यापैकी काही रहिवाशांना लल्लूभाई कम्पाऊंड येथील पुनर्वसन इमारतीमध्ये राहण्यासाठी देकारपत्रसुद्धा मिळाले. परंतु प्रत्यक्षात त्या जागी भलतेच रहिवासी राहत असल्याने या पुनर्वसनाच्या कामात आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप राजीव कदम यांनी केला आहे. एमएमआरडीए व स्पार्क या संस्था त्याला जबाबदार असून, त्यांच्यावर चौकशी आयोग नेमण्याची त्यांनी प्रेस क्लब येथे पत्रकार परिषदेत मागणी केली.
मानखुर्द येथील ट्रान्झिट कॅम्पमध्ये १२00 खोल्या असून या नागरिकांना रोज दिवसाला ५0 रुपयाचे पाणी विकत घ्यावे लागते. इथे वीजचोरी करणार्‍यांकडून घरात वीज घ्यावी लागते. त्याला महिन्याकाठी पैसे मोजावे लागतात. महापालिकेचे पाणी खात्याचे अधिकारी अरुण कदम व रिलायन्सचे अधिकारी मिळून येथील जनतेची अक्षरश: लूट करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.महानगरपालिका व एमएमआरडीए या विभागात नागरी सुविधा पुरवण्यास अपयशी ठरली असून, या दोन्ही यंत्रणा एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. एमएमआरडीए व स्पार्क यांनी मिळून कमीत कमी २८0 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचे राजीव कदम यांचे म्हणणे आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages