खाजगी विद्यापीठांच्या विरोधात आंदोलन - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

खाजगी विद्यापीठांच्या विरोधात आंदोलन

Share This
मुंबई : खाजगी विद्यापीठांच्या मनमानीविरोधात विद्यार्थी भारती संघटनेने आझाद मैदानात शुक्रवारी आंदोलन केले. खाजगी विद्यापीठांना आरक्षणाची मान्यता दिली असली तरी त्यांनी फक्त जागेचे आरक्षण मान्य केले आहे, मात्र विद्यार्थ्यांवर फीचा बोजा टाकला आहे. गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा हा डाव असल्याचा आरोप विद्यार्थी भारती संघटनेने केला आहे.
बहुजनांचे शैक्षणिक प्रमाण वाढत असतानाच सरकारने खाजगी विद्यापीठांना मान्यता देऊन शिक्षणाच्या खाजगीकरणास एक प्रकारे मान्यता दिली आहे. सरकारची ही हुकूमशाही सहन करणार नाही, असे विद्यार्थी भारतीच्या कार्याध्यक्षा विजेता भोनकर यांनी म्हटले आहे. खाजगी विद्यापीठांमध्ये फीमध्ये आरक्षण न मिळाल्यास गोरगरीब विद्यार्थी कधीच शिकू शकणार नाही आणि विषमतेची दरी कमी होण्यापेक्षा वाढतच जाईल. त्यामुळे खाजगी विद्यापीठात फी माफी मिळालीच पाहिजे, अशी ठाम भूमिका विद्यार्थी भारतीने घेतली आहे. राज्य सरकारने खाजगी विद्यापीठांच्या फी बाबतीत निर्णय न घेतल्यास मंत्रालयावर 'टाळे ठोको' आंदोलन करण्यात येईल, असा इशारा विद्यार्थी भारतीने दिला आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages