राखीव जागांवरच पक्षातील कार्यकर्त्यांना निवडणूक लढवण्यास संधी - रामदास आठवले - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

राखीव जागांवरच पक्षातील कार्यकर्त्यांना निवडणूक लढवण्यास संधी - रामदास आठवले

Share This
मुंबई - महायुतीमधून ज्या जागा रिपाईच्या वाट्याला येतील त्यापैकी राखीव जागांवरच पक्षातील कार्यकर्त्यांना निवडणूक लढवण्यास संधी दिली जाईल. इतर जागांवर मात्र अपक्ष आमदार आणि पक्षात नव्याने समावेश केलेल्या लोकांना संधी देवू असे पक्षाध्यक्ष रामदास आठवले यानी पत्रकार परिषदेत जाहीर केल्याने कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. 

भारतीय स्पायडरमॅन म्हणून प्रसिद्ध असलेल्या गौरव शर्मा व सिनेकलावंत रॉनी विल्यम्स यांनी गुरुवारी रिपब्लिकन पक्षात (आठवले गट) प्रवेश केला यावेळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदे वेळी आठवले बोलत होते. पक्षाने 60 टक्के दलित व 40 दलितेतरांना पक्षात संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पक्षात विविध जाती-धर्मांचे नागरिक प्रवेश करत आहेत अशा लोकांना निवडणुकीमध्ये संधी देण्यात येईल असे आठवले यांनी सांगितले. 

सीबीआय चौकशीची मागणी 
नितीन आगे व कल्पना गिरी हत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी आठवलेंनी केली. राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांची आठवलेंनी आज भेट घेतली, त्या वेळी त्यांनी ही मागणी केली. आगे व गिरी कुटुंबियांनी सीबीआय चौकशीची मागणी केल्यास त्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल असे पाटील यांनी स्पष्ट केले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages