कॅम्पा कोलावर कारवाई होणारच - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

कॅम्पा कोलावर कारवाई होणारच

Share This

campa-cola

मुंबई  / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.comकॅम्पा कोला कम्पाऊंडमधील सदनिकाधारकांना घरे रिकामी करण्यासाठी सुप्रीम कोर्ट आणि महापालिकेने दिलेली मुदत सोमवारी रात्री संपली. मात्र रहिवाशांनी मागील आठवड्यात पुन्हा सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. ज्यावर सुनावणी करताना कोर्टाने आज ही याचिका फेटाळून लावली.
कॅम्पा कोला रहिवाशांना सुप्रीम कोर्टाने ३१ मेपर्यंत घरे रिकामी करण्याचे आदेश दिले होते. तर पालिकेने २९ मे ते २ जून या कालावधीत जी-दक्षिण प्रभाग कार्यालयात घरांच्या चाव्या जमा करण्याच्या नोटीसा पाठवल्या होता. सोमवारी संध्याकाळपर्यंत एकाही रहिवाशाने पालिकेच्या आवाहनाला दाद ‌न देता घरे रिकामी करणार नाही, असा निर्धार केला आहे. सुप्रीम कोर्ट मंगळवारी काय निर्णय देते, याकडे राज्य सरकार आणि महापालिकेचे लक्ष लागून राहिले होते. आज कोर्टाने कॅम्पा कोलाच्या रहिवाशांची माहिती फेटाळून लावली, त्यामुळे कारवाई होणारच असे चित्र स्पष्ट झाले आहे. मागील वर्षी पावसाळा तोंडावर असताना कॅम्पा कोलाची याचिका सुप्रीम कोर्टात सुनावणीसाठी आली होती. तेव्हा कोर्टाने मानवतवादी दृष्टीकोनातून पावसाळ्यासह पाच महिन्यांची मुदतवाढ दिली होती. यंदाही तशीच परिस्थिती उद्भवली आहे. अशी मुदतवाढ मिळाल्यास पावसानंतर विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे. त्यामुळे हे प्रकरण आणखी काही महिने पुढे ढकलले जाण्याची शक्यता होती.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages