मृत्यू रोखण्यासाठी रेल्वेची जनजागृती - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मृत्यू रोखण्यासाठी रेल्वेची जनजागृती

Share This
मुंबई  / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.comमानवविरहित रेल्वे फाटकांमुळे होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेतर्फे जनजागृती मोहितेअंतर्गत तब्बल एक कोटी प्रवाशांना एसएमएस करण्यात येणार आहे. २ ते ६ जूनपर्यंत चालणाऱ्या 'आंतरराष्ट्रीय लेव्हल क्रॉसिंग जनजागृती' मोहिमेचा भाग म्हणून मध्य रेल्वेतर्फे पुढाकार घेण्यात येणार आहे. 'मरे'तर्फे राज्यात एसएमएसप्रमाणेच जाहिरातीही करण्यात येणार आहेत. त्यात, मराठी, हिंदी, इंग्रजी अशा तिन्ही भाषांतील जाहिरातींचा समावेश करण्यात आला आहे. त्याशिवाय, प्लॅटफॉर्मवर फाटक ओलांडताना काळजी घेण्याचे आवाहनही केले जाणार आहे.राज्यात अनेक ठिकाणी मानवविरहित रेल्वे फाटक असून तिथे अपघातांची शक्यता मोठ्या प्रमाणावर असते. त्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली जाणार असल्याचे 'मरे'चे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी स्पष्ट केले. 
राज्याने पुढाकार घेतल्यास पादचारी पूल रेल्वे फाटक असणाऱ्या जागी राज्याने ५० टक्के भागीदारीची तयारी दाखवल्यास त्या ठिकाणी पादचारी पूल बांधण्याची रेल्वेची योजना आहे. त्याप्रमाणे राज्याने तयारी दाखवल्यास पूल बांधण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. देशात एकूण ३१,२५४ रेल्वे फाटक आहेत. त्यापैकी १८,६७२ फाटकांवर रेल्वे कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, १२,५०० रेल्वे फाटक मानवविरहित आहेत. १३८ मानवविरहित फाटक नामशेष 'मरे'ने चार वर्षांत १३८ मानवविरहित फाटक बंद केली आहेत. येत्या चार वर्षांत आणखी १०९ मानवविरहित फाटक बंद केली जाणार आहेत.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages