सोमवार सकाळ पासून कारवाही
मुंबई / अजेयकुमार जाधव
वरळी येथील अनधिकृत क्याम्पाकोला वासियांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी झालेल्या चर्चे नंतर आपला विरोध मावळला असून पालिकेला कारवाही करण्यास सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे. यामुळे आता सोमवार सकाळ पासून क्याम्पाकोला वर कारवाही करण्याचा पालिकेचा मार्ग मोकळा झाला आहे.
वरळी येथील क्याम्पाकोला वसाहतीवर सर्वोच्च न्यायालायाच्या आदेशाने २० जून पासून पासून कारवाही करण्यात येणार होती. पालिकेचे अधिकारी वीज पाणी ग्यास कनेक्शन तोडण्याची कारवाही करण्यास गेले असता रहिवाश्यांनी वसाहतीचे मुख्य गेट बंद करून पालिकेच्या अधिकाऱ्यांना वसाहती मध्ये प्रवेश दिला नव्हता. पालिकेचे अधिकारी वसाहती मध्ये प्रवेश मिळावा म्हणून दोन दिवस रहिवाश्यांची समजूत हलत होते परंतू रहिवाश्यांनी पालिकेचे काहीही ऐकण्यास नकार दिल्याने न्यायालयाचा अवमान व सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी पालिकेने रहिवाश्यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला होता.
रविवारी सकाळी पालिकेचे अधिकारी पुन्हा कारवाही करण्यास गेले असता रहिवाश्यांनी आपला विरोध कायम ठेवला परंतू दोन महिलांना चक्कर आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर मात्र रहिवाश्यांचा विरोध कमी होऊ लागला. त्यातच मुख्यमंत्र्यांनी चर्चेला बोलावल्या नंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही संघर्ष करून थकलो आहोत आता आम्ही विरोध करणार नाही पालिकेने आपली कारवाही करावी, पालिकेबरोबर आणि सरकारबरोबर चर्चा करून तोडगा काढू असे रहिवाश्यांनी स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्र्यांनी आम्हाला तोडगा काढण्याचे अश्व्सासन दिले आहे आम्हाला आमच्या हक्काचा एफएसआय मिळावा या मधून आम्हाला लहान घरे मिळाली तरी आम्ही हि घरे स्वीकारू असे रहिवाश्यांनी सांगितले आहे. दरम्यान रहिवाश्यांनी विरोध करायचा नाही असे ठरवल्याने सोमवार सकाळ पासून क्याम्पाकोला वसाहतीमधील वीज पाणी आणि ग्यास कनेक्शन तोडण्यास सुरुवात होणार आहे.
