पुण्यातील अपंग मुलीच्या बलात्कार आणि गर्भपात प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पुण्यातील अपंग मुलीच्या बलात्कार आणि गर्भपात प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी

Share This
मुंबई / अजेयकुमार जाधव   / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.com
पुणे येथील भाऊसाहेब अपंग कल्याण केंद्र मधील तीन अल्पवयीन मुलींचा बलात्कार करून गर्भपात करण्यात आला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी मोकाट असल्याने प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपीवर कारवाही करावी करावी अशी मागणी विलास पंदारे यांनी केली आहे. 
मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये आणे तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथील भाऊ साहेब अपंग कल्याण केंद्र या अपंगांच्या निवासी शाळेमध्ये तीन अल्पवयीन मुलीवर एक कर्मचाऱ्याकडून बलात्कार करण्यात आला. हा प्रकार समजताच संस्थाचालक प्रकाश बोहरा यांनी प्रकरण दाबण्याच्या उद्देशाने या बालात्काऱ्याला पळवण्याचा प्रयत्न केला. मुलींवर बलात्कार व नंतर गर्भपात झाला असताना याची कुठेही तक्रार न करता पालकांना याची कल्पना देण्यात आलेली नाही. तसेच पालकांना संस्थाचालकांनी पैसे देऊन तक्रार करू नका असे सांगितले होते. संस्थाचालक हे एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी असल्याने त्यांच्यावर कोणतीही कारवाही करण्यात आलेली नाही असे विलास पंदारे यांनी सांगितले. 

या शाळेवर २००८ मध्ये कारवाही झाली होती. तेव्हा शाळेला सुधारण्याची संधी देण्यात आली होती. परंतू शाळेने सुधारण्याचा कोणताही प्रयत्न केलेला नाही. शाळेमध्ये तीन  अत्याचार करणारा जेल मध्ये असला तरी सह आरोपी जामिनावर सुटले आहेत. हे सर्व सह आरोपी याच शाळेमध्ये पुन्हा कामावर येत असल्याने या शाळेमधील इतर मुलीं बरोबर सुद्धा असे प्रकार घडू शकतात. यामुळे सरकारने सदर प्रकरणाची गंभीर दखल घेवून संस्था चालक प्रकाश बोहरा यांच्यावर कारवाही करावी तसेच शाळा बंद करावी अशी मागणी शुभांगी शिंदे यांनी केली आहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages