मुंबई : विलेपार्ल्यातील आ. कृष्णा हेगडे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अभिनव पद्धतीने रेल्वे दरवाढीचा विरोध केला. मोदी यांचा मुखवटा घातलेल्या कार्यकर्त्यास आ. हेगडे यांनी रेल्वेची तिकीट सादर करत आपला विरोध दर्शवला. 'अबकी बार झुठी सरकार, अबकी बार पनवती सरकार, और अच्छे दिन आनेवाले है, अशा घोषणा देत फलक दाखवत विलेपार्ले रेल्वे स्थानकाबाहेर रेल्वे दरवाढीविरोधात आंदोलन करण्यात आले.
केंद्र सरकारने दुपटीपेक्षा जास्त प्रमाणात रेल्वे भाडेवाढ केली आहे. मुंबईकरांनी मोदी सरकारला सहा खासदार दिले. त्याची परतफेड सरकारने अशा तर्हने भाडेवाढ करून केल्याचे आ. हेगडे म्हणाले. द्वितीय वर्गाचा सीजन पास पूर्वी ८५ रुपयांना होता आता त्याची किंमत १५0 रुपये झाली आहे. प्रथम वर्गाचा पास ३00 वरून ६२५ रुपयांपर्यंत पोहचला आहे. हे अन्यायकारक असून, जोपर्यंत भाडेवाढ मागे घेत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे आ. हेगडे या वेळी स्पष्ट केले.