नवी दिल्ली: रुग्णाईत भारतीय अर्थव्यवस्थेस पुन्हा गोंडस करण्याच्या नावाखाली जनतेला कडू डोस पाजण्याची मोदी सरकारने योजलेले कठोर आर्थिक उपायांचे उपचार असेच सुरु राहणार असून शुक्रवारी केलेल्या रेल्वेच्या जबर दरवाढीनंतर आता कोटय़वधी घरांमध्ये स्वयंपाकासाठी वापरल्या जाणा:या गॅसच्या किंमतीही वाढविण्यात येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
रेल्वेची दरवाढ गेल्या 15 वर्षातील सर्वाधिक असली आणि त्याविरुद्ध विरोधाचे सूर उमटले असले तरी जनतेचा संताप सरकारला जाग येईल एवढय़ा तीव्रतेने उफाळून आलेला दिसत नाही. रेल्वे दरवाढीची कडू गोळी जनतेच्या कितपत पचनी पडते याचा अंदाज घेऊन सरकार स्वयंपाकाच्या गॅसच्या भाववाढीचा डोस पाजेल, असे जाणकारांना वाटते.
