मुंबई / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.com) बला त्कार, लैंगिक शोषण, लैगिंक अत्याचार आणि छेडछाड संबंधित अन्यायग्रस्त मुलींना, महिलांना वैद्यकीय, न्यायप्रकियेत मदत व्हावी तसेच त्यांना मानसिक समुदपेशन करता यावे म्हणून मदत करणारे देशातील पहिले समुपदेशन केंद्र ( सेंटर फॉर एक्सलंन्स) मुंबईच्या केईएम रूग्णालयात उभे करण्यास महापालिका आयुक्त सिताराम कुंटे यांनी तत्वतः मान्यता दिली आहे. या सेंटरसाठी निर्भया फंडातून निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी करीत भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची दिल्ली येथे आज भेट घेतली.
दिल्लीत निर्भया वर बलात्कार घडल्याची घटना घडल्यानंतर तत्कालिन केंद्र सरकारने अशा अन्यायग्रस्त मुलींना आणि महिलांना मतदत करता यावी म्हणून 1 हजार कोटींचा निर्भया फंड उपलब्ध करून दिला होता. मात्र त्यातील एकही रूपया खर्च झाला नाही. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान मुंबईत झालेल्या जाहीर सभेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निधीचा उल्लेख केला होता. त्यानंतर दिल्लीत नरेंद्र मोदी यांची भेट घेवून समुपदेशन केंद्राच्या संकल्पनेबाबत आमदार आशिष शेलार यांनी चर्चा केली होती.
तर त्यानंतर आ. आशिष शेलार यांच्या उपस्थितीत 6 जून रोजी पालिका आयुक्त सिताराम कुंटे यांच्या दालनात मुंबईचे पोलिस सह आयुक्त यांच्या उपस्थितीत संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीत पालिका आयुक्तांनी परेल येथील केईएम रूग्णालयात अशा प्रकारचे सेंटर उभे करण्याला तत्वतः मान्यता दिली. पुढील सात दिवसात याबाबतचा प्रत्यक्ष कार्यपध्दतीचा अहवाल (स्टँडर्ड ऑपरेटींग गाईडलाईन रिपोर्ट) तयार करून पंधरा दिवसात त्याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात येईल, असे सांगितले.
दरम्यान, आज आमदार आशिष शेलार यांनी दिल्ली येथे जाऊन केंद्रीय राजनाथ सिंह यांची दिल्ली येथे जावून भेट घेतली. या भेटीत त्यांनी या सेंटरसाठी निर्भया फंडातून केंद्र शासनाने तात्काळ निधी उपलब्ध करून राज्य शासनाला या सेंटरच्या उभारणीबाबत निर्देश द्यावेत अशी मागणी केली.
