मेट्रो भाववाढीच्या विरोधात भाजपाचे आंदोलन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 June 2014

मेट्रो भाववाढीच्या विरोधात भाजपाचे आंदोलन

पृथ्वीराज चव्हाण यांचे सरकार आणि अनिल अंबानींच्या रिलायन्स यांनी फिक्सिंग करून मेट्रो तिकीटाची  भाववाढ करण्याचा घाट घातला आहे त्याचा निषेध करीत मुंबई भाजपाच्या महिला आणि युवा मोर्चा तर्फे आज वांद्रे कुर्ला कॉप्लेक्स येथील एम.एम.आर.डी.ए. च्या कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

मेट्रोच्या तिकिटाचे दर ठरविण्यासाठी लवाद नियुक्त करण्यात यावा अशी याचिका महाराष्ट्र सरकारच्या वतीने एम.एम.आर.डी.ए. ने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती ही याचिका न्यायालयाने मंगळवारी फेटाळली त्यामुळे रिलायन्सला मेट्रोची दरवाढ करण्याचे मार्ग खुले झाले आहेत. यामध्ये पृथ्वीराज चव्हाण यांचे सरकार आणि अनिल अंबानी यांचे रिलायन्स यांच्यात मॅच फिक्सिंग झाली आहे असा आरोप करीत मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने आज एम.एम.आर.डी.ए. वर मोर्चा काढला

न्यायालयातून याचिका फेटाळलीच जाणार होती कारण सरकारने कमकुवत भूमिका घेऊन रिलायन्सला फेवर करण्याचा घाट घातला आहे त्यामुळे मेट्रोचे तिकीट १३ रुपयांवरून ४० रुपये एवढे वाढणार आहे हा सर्वसामन्य मुंबईकरांच्या खिश्यावर मारलेला डल्ला आहे असा आरोप करीत आमदार अॅड. आशिष शेलार यांनी या भाववाढीचा निषेध केला. आजचा मोर्चा प्रातिनिधिक होता जर भाववाढ मागे घेतली नाही तर मुंबईच्या सर्व मेट्रो स्टेशनवर उतरून भाजप आंदोलन करेल अशा इशारा आमदार अॅड. आशिष शेलार यांनी यावेळी दिला.

Displaying AshishjiMetro2.jpg

Post Bottom Ad

JPN NEWS