मुंबई / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.com) विधानसभेच्या निवडणुकांनंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार, याबाबत महायुतीच निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट करत उद्वव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारीबाबतच्या चर्चांवर पडदा टाकला आहे. सामनामधून मांडण्यात आलेले विचार हे शिवसैनिकांचे विचार आहेत. शिवसैनिकांचे माझ्यावर प्रेम असल्याने त्यांच्या भावनेचा मी आदर करतो. पण एका पक्षाचा पक्षप्रमुख म्हणून मी महायुतीत असणा-या सर्व पक्षांबरोबर चर्चा केल्याशिवाय कोणताही निर्णय घेणार नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. तसेच निवडणूक लढवण्याबाबतही अद्याप काहीही ठरवले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात भूमिका स्पष्ट केली. निवडणूक लढवण्यासंदर्भात किंवा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री व्हायचे का? याबाबत अद्याप कोणताही विचार केलेला नाही. महायुतीतील मित्रपक्षांच्या प्रमुख नेत्यांबरोबर चर्चा केल्याशिवाय याबाबत कोणताही निर्णय घेणार नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
