नागरिकांना मिळणार राष्ट्रीय ओळखपत्र ! - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

नागरिकांना मिळणार राष्ट्रीय ओळखपत्र !

Share This
नवी दिल्ली : देशातील नागरिकांचे राष्ट्रीय ओळखपत्र बनवण्याला सरकारची प्राथमिकता असल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले. यासंबंधी लवकरात लवकर प्रस्ताव तयार करण्यासाठी अधिकार्‍यांना आदेश देण्यात आले असून, त्यामुळे राष्ट्रीय जनगणना नोंदणी प्रक्रिया सुलभ व अचूक होण्यास मदत होणार असल्याचे सिंह म्हणाले.
यासंदर्भात गृहमंत्र्यांनी राष्ट्रीय जनगणना अधिकारी सी. चंद्रमौली यांच्यासमवेत बैठक घेतली. या बैठकीला गृहराज्यमंत्री किरण रिजिजू आणि गृहसचिव अनिल गोस्वामी यांचीही हजेरी होती. चंद्रमौली यांनीच केंद्राला यासंदर्भात रूपरेषा सादर केली होती, ज्यात राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने ओळखपत्राचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले होते. या बैठकीत या योजनेची सद्य:परिस्थिती व पुढील कारवाईसंबंधी चर्चा झाली. जन्म-मृत्यूच्या नोंदणी यंत्रणेला एकासोबत जोडून सापेक्ष आकडेवारी तयार करत देशातील नागरिकांना ओळखपत्र देण्यासाठी सर्व आवश्यक प्रस्तावांना मंजुरी देण्याचे निर्देश गृहमंत्रालयाने दिले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages