मुंबई / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.com) मुंबई महापालिकेच्या शिवडी परिसरातील प्रबोधनकार ठाकरे महापालिका शाळेत शिकणार्या सर्व विद्यार्थ्यांसाठी शाळेचा सोमवारचा पहिला दिवस हा खर्या अर्थाने आनंदाचा अविस्मरणीय ठेवा ठरला, कारण शाळेच्या पहिल्याच दिवशी महापौरांच्या हस्ते मुलांना शालेय वस्तूंचे व क्रमिक पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी संसदेत भाषण करताना देशभरातील शाळांमध्ये व्हच्र्युअल एज्युकेशनचा प्रयोग राबविला जाणार असल्याचे सांगितले होते. ही बाब एका वेगळ्या अर्थाने सर्व मुंबईकरांसाठी आणि मुंबईचा प्रथम नागरिक म्हणून माझ्यासाठीसुद्धा आनंदाची व अभिमानाची बाब आहे, असेही महापौरांनी याप्रसंगी आवर्जून नमूद केले.
भागृह नेत्या तृष्णा विश्वासराव या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, महापालिका शाळेत येणार्या प्रत्येक विद्यार्थ्याला महापालिकेतर्फे २७ शालेय वस्तू व क्रमिक पुस्तके मोफत येतात. या सर्व वस्तूंचा चांगला व परिपूर्ण उपयोग करावा, असे आवाहन करून त्या विद्यार्थ्यांना म्हणाल्या की, चांगला अभ्यास करा आणि आपल्या आई-वडिलांचे व आपल्या शाळेचे नाव मोठे करा. त्याचप्रमाणे २७ शालेय वस्तूंचे महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना वितरण करणारी बृहन्मुंबई महापालिका ही देशातील एकमेव असल्याचेही तृष्णा विश्वासराव यांनी नमूद केले.
