देवनार डम्पिंग ग्राऊंड हटाव मोहिमेला पुन्हा सुरुवात - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

देवनार डम्पिंग ग्राऊंड हटाव मोहिमेला पुन्हा सुरुवात

Share This
मुंबई  / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.comदेवनार डम्पिंग ग्राऊंडमुळे स्थानिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. याबाबत रास्ता रोको करूनही महानगरपालिकेने दखल न घेतली नाही. त्यामुळे मानखुर्द-शिवाजीनगर येथील रहिवाशांच्या आरोग्यासाठी घातक असलेले डम्पिंग कायमचे बंद करावे, अशी मागणी करत आंदोलनाचा इशारा माजी आमदार व विद्यमान म्हाडाच्या मुंबई मंडळाचे सभापती युसूफ अब्राहनी यांनी दिला आहे. 
आशिया खंडातील सर्वात मोठी कचरा क्षेपणभूमी (डम्पिंग ग्राऊंड) म्हणून देवनार ओळखले जाते. मानखुर्द-शिवाजी नगर या विभागातील लोकसंख्या १४ लाखांच्या आसपास आहे. मुंबई शहरातील हजारो टन कचरा येथे टाकण्यात येतो. ११0 एकरात पसरलेल्या या ग्राऊंडभोवती संरक्षक भिंत देखील बांधण्यात आली नाही. सध्या डम्पिंग ग्राऊंडमधील कचर्‍याची उंची वाढून ९ मजली इमारतीपर्यंत पोहचली आहे. डम्पिंग ग्राऊंडमधील कचरा कुजून निर्माण होणार्‍या दूषित वायूमुळे मानखुर्द-शिवाजी नगर परिसरातील रहिवाशांना शारीरिक आणि मानसिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. वर्षाला जवळपास २ हजार रहिवाशांचा मृत्यू क्षयरोगाने होत आहे. 

डम्पिंग ग्राऊंडमधील कचर्‍याचे शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट होत नसल्याने परिसरातील रोगराईचे प्रमाण मुंबई शहराच्या दुप्पट आहे. सायनच्या पुढे मुंबईकरांना एक न्याय आणि शिवाजी नगर-मानखुर्दला दुसरा अशी सापत्नभावाची वागणूक महापालिका येथील नागरिकांना देत असल्याचा आरोप माजी आमदार अब्राहनी यांनी केला. आम्हाला केवळ थातूरमातूर कारवाई नको असून हे डम्पिंग ग्राऊंड कायमचे बंद करण्याची त्यांनी मागणी केली आहे. त्यासाठी सनदशीर मार्गाने महापालिकेच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages