बलात्काराबाबतच्या विधानामुळे गृहमंत्र्यांवर टीका - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बलात्काराबाबतच्या विधानामुळे गृहमंत्र्यांवर टीका

Share This
मुंबई  / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.com'बडे शहरोंमे ऐसे छोटे हादसे होते रहते है', या मुंबई हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केलेल्या वक्तव्यानंतर समाजातील असंतोषाचा हादरा बसलेले गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी बुधवारी विधान परिषदेतील वक्तव्यांनी नवा वाद ओढवून घेतला. 
बलात्काराच्या वाढत्या घटनांचे आकडेवारीनिशी विश्लेषण करून पोलिस विभागाचा बचाव करताना, पाटील भलत्याच वळणावर गेले. महाराष्ट्रात मुलींवर वडील अथवा भावाने बलात्कार करण्याचे प्रमाण ६.३४ टक्के आहे, तर जवळच्या नातलगांकडून बलात्कार होण्याचे प्रमाण ६.६२ टक्के आहे, अशी आकडेवारी त्यांनी पुढे केली. जाहिराती व मीडियातून केले जाणारे स्त्री देहाचे ओंगळवाणे प्रदर्शन सामाजिक अधःपतनास हातभार लावत असल्याचा निष्कर्षही पाटील यांनी काढला.

विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्यासह अन्य सदस्यांनी नियम २६०अन्वये महिला व दलितांवरील वाढत्या अत्याचारासंबंधी चर्चेचा प्रस्ताव दिला होता. त्यावर उत्तर देताना गृहमंत्री पाटील म्हणाले की, वडील-भाऊ यांच्याकडून व नातलगांकडून होणाऱ्या बलात्काराचे प्रमाण गंभीर आहे. एकूण बलात्कारांपैकी ४० टक्के बलात्कार हे ओळखीच्या व्यक्तींकडून केले जातात. त्यामध्ये २१ टक्के बलात्कार शेजाऱ्यांकडून, १८ टक्के बलात्कार सहकाऱ्यांकडून, १.५ टक्के बलात्कार घरमालकांकडून होतात. लग्नाचे आमिष दाखवून होणाऱ्या बलात्कारांचे प्रमाण ४२ टक्के आहे, असे ते म्हणाले. याच संदर्भात बोलताना आबांनी एक वादग्रस्त वक्तव्य केल्याची चर्चा होती. विधानसभेत मनसे आमदार प्रवीण दरेकर यांनी तो मुद्दा उपस्थित केला. त्यावर, तसे वक्तव्य आपण केलेले नाही, असे सांगत, प्रसारमाध्यमांनी त्याचा विपर्यास केला आहे, असा ठपका आबांनी ठेवला.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages