पालिकेची वांद्रे आणि खार पश्चिम विभागात पालिकेची ९२ वाहने रत्यावर बेवारस पडली असल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे.
शरद यादव यांनी माहितीच्या अधिकाराखाली मिळवलेल्या माहितीमध्ये वांद्रे आणि खार पश्चिमेकडील परिसरात तब्बल 92 वाहने रस्त्यावर बेवारस अवस्थेत उभी आहेत. संपूर्ण मुंबईचा विचार केल्यास ही संख्या मोठी असू शकते. या 92 वाहनांपैकी अनेक वाहानांचे क्रमांकही गहाळ झाले आहेत. ती हटवण्यासाठी पालिकेच्या अतिक्रमण विभागाने निविदा काढण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी पालिकेच्या विधी खात्याकडून गेल्या वर्षी अहवाल मागवला होता; मात्र अद्याप तो आला नसल्याने निविदा प्रक्रिया रखडली आहे.
