रक्ताचे दर दुपटीने वाढले - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

रक्ताचे दर दुपटीने वाढले

Share This
मुंबई  / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.comमहागाईची झळ आता रक्तापर्यंत येऊन पोहोचली आहे. राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेने रक्ताचे दर दुपटीने वाढवले आहेत; पण अत्यंत दुर्मिळ असे रक्त घटकाचे दर कमी करण्यात आले आहेत, हा त्यात दिलासा आहे.
राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेने खासगी आणि सरकारी रक्तपेढ्यांसाठी रक्ताचे दर निश्‍चित केले आहेत. बुधवारी यासाठी परिपत्रक जाहीर केले आहेत. रक्त सेवा शुल्कात सुधारणा करण्यासाठी दि फेडरेशन ऑफ नागपूर ब्लड बॅंक यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या अनुषंगाने राज्य रक्त संक्रमण परिषदेतर्फे रक्त व रक्त घटकांची प्रक्रिया चाचणी शुल्कात सुधारणा करण्यासाठी 16 सदस्यीय समिती स्थापन केली होती. 

ज्यामध्ये रेड क्रॉस, शासकीय रक्तपेढी, अन्न व औषध प्रशासन आदी प्रतिनिधींचा समावेश होता. या समितीने रक्त आणि रक्त घटकांसाठी सुधारित दर निश्‍चित करून तो प्रस्ताव राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेला पाठवला. त्यानुसार राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेने सुधारित सेवा शुल्काबाबत परिपत्रक जाहीर केले. रक्ताचे दर वाढले असले, तरी हिमोफेलिया, थॅलेसेमिया, सिकलसेल, ऍनिमिया या आजाराचे रुग्ण; तसेच रक्ताशी निगडित आजार झालेल्या रुग्णांना मोफत रक्तपुरवठा करणे बंधनकारक असणार आहे.

रक्त आणि रक्त घटकाचे सध्याचे आणि सुधारित दर
रक्त घटक पालिका आणि सरकारी रुग्णालयातील दर सुधारित दर 
रक्त 450 रु. प्रतियुनिट (एक पिशवी) 1050 प्रतियुनिट
लाल पेशी 450 1050
ेफ्रेश फ्रोझन प्लाझ्मा 450 300
प्लेटलेट्‌स कॉन्सनट्रेट 450 300
क्रायोप्रेसिपिटेड प्लेटलेट्‌स (ए) 450 200

खासगी रक्तपेढ्यांचे दर
रक्त घटक सध्याचे दर सुधारित दर 
रक्त 850 रु. प्रतियुनिट (एक पिशवी) 1450 प्रतियुनिट
लाल पेशी 850 1450
प्लेटलेट्‌स 400 400
ेफ्रेश फ्रोझन प्लाझ्मा 450 300
प्लेटलेट्‌स कॉन्सनट्रेट 400 400
क्रायोप्रेसिपिटेड प्लेटलेट्‌स (ए) 200 250

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages