| मुंबई / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.com) ग्रामीण भागातील जनतेला लग्न आणि इतर समारंभांसाठी पाहुण्यांची ने-आण करण्यासाठी फायदेशीर ठरणार्या तसेच देवदर्शनासाठी ठरवण्यात येणार्या एसटीच्या नैमित्तिक करार दरात १ जूनपासून बदल करण्यात आले आहेत. परिवर्तन बस, हिरकणी, वातानुकू लित शिवनेरी यांच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली आहे. परिणामी, शालेय विद्यार्थ्यांच्या सहलीही महाग होणार आहेत. तसेच ग्रामीण भागातील वर्हाड आणि देवदर्शन महाग झाले आहे. एसटी महामंडळ आपल्या बसेस लग्न समारंभासाठी, सहलीसाठी व इतर कार्यक्रमांसाठी भाड्याने (नैमित्तिक करारावर) देते. अशा बसेसच्या दरामध्ये रविवार, १ जूनपासून वाढ करण्यात आली आहे. गर्दीच्या आणि कमी गर्दीच्या हंगामातील दर वेगवेगळे असणार आहेत. नैमित्तिक करारासाठी प्रति बस (वातानुकूलित वगळता) प्रतिदिन किमान ३00 किमी होणे आवश्यक आहे. वातानुकूलित बससाठी प्रतिदिन किमान ४५0 किमी होणे आवश्यक आहे. शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहलींसाठी नैमित्तिक कराराच्या दरात ५0 टक्के सवलत दिली जाते; परंतु ही सवलत फक्त साध्या आणि परिवर्तन बसेससाठी लागू आहे. ही सवलत महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्यापुरतीच र्मयादित आहे, तर नैमित्तिक करार रद्द करण्याच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. |
| बस गर्दीच्या हंगामात कमी गर्दीच्या हंगामात (१ मार्च ते ३0 जून ) (१ जुलै ते २८-२९ फेब्रुवारी) दुहेरी एकेरी दुहेरी एकेरी साधी सेवा ४0 आसनांपर्यंत ३७ (३६) ६४ (६३) ३४ (३३) ६0 (५९) ५0 आसनांपर्यंत ४६ (४५) ८0 (७८) ४३ (४२) ७५ (७३) ५५ आसनांपर्यंत ५१ (४९) ८८ (८६) ४७ (४६) ८३ (८0) ६६ आसनांपर्यंत ६१ (५९) १0६ (१0३) ५७ (५५) ९९ (९६) परिवर्तन बस (२ बाय २) ४५ आसनांपर्यंत ४७ (४६) ८२ (८0) ४१ (४0) ७२ (७0) ५0 आसनांपर्यंत ५२ (५१) ९१ (८९) ४६ (४५) ८0 (७९) निमआराम सेवा- हिरकणी ४0 आसनांपर्यंत ४५ (४४) ७९ (७७) ३९ (३८) ६९ (६७) ५0 आसनांपर्यंत ५६ (५५) ९९ (९६) ४९ (४८) ८६ (८४) निमआराम एसी शीतल ४५ आसनांपर्यंत ६८ (६७) १२0 (११७) दोन्ही हंगामात सारखे वातानुकूलित शिवनेरी ४५ आसनांपर्यंत ९३ (९१) १६३(१५९) दोन्ही हंगामात सारखे मिडी बस-यशवंती ३२ आसनी साधी सेवा४१ (४0) ७२ (७0) दोन्ही हंगामात सारखे |

