इंटरनेट कनेक्‍शनशिवाय फेसबुक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 June 2014

इंटरनेट कनेक्‍शनशिवाय फेसबुक

मुंबई  / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.com) भारत संचार निगम लि.ने (बीएसएनएल) दिलेल्या एका नवीन सेवेनुसार ग्राहकांना आता फेसबुक कोणत्याही इंटरनेट किंवा डेटा कनेक्‍टिव्हिटीशिवाय वापरता येणार आहे. त्यासाठी युजरना तीन दिवस, एक आठवडा किंवा महिनाभरासाठी दर आकारणी करून ही सेवा देण्यात येईल. 
बीएसएनएलने नुकताच एक करार U20pia र्ल कंपनीसोबत केला आहे. त्यानुसार "फेसबुक ऍक्‍सेस‘ इंटरनेट किंवा डेटा प्लॅन कनेक्‍टिव्हिटीशिवाय उपलब्ध होईल. अनस्ट्रक्‍चर्ड सप्लिमेंटरी सर्व्हिस डेटा (यूएसएसडी) या सेवेद्वारे फेसबुक वापरणे शक्‍य होणार आहे. बीएसएनएलच्या दक्षिण, पश्‍चिम आणि उत्तर झोनमध्ये ही सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 

सध्या यूएसएसडी तंत्रज्ञानाचा वापर दूरसंचार ग्राहकांना ऍलर्ट पाठवण्यासाठी होतो; तसेच प्रीपेडच्या कॉलबॅक सेवेसह लोकेशनवर आधारित सेवा आणि मेनूवर आधारित सेवांसाठीही हे तंत्रज्ञान वापरले जाते. बीएसएनएलद्वारे यूएसएसडी सेवेमुळे फेसबुक अकाऊंट ऍक्‍सेस मिळण्यासोबतच पोस्ट आणि स्टेटस मेसेज पाहणे, फ्रेण्ड रिक्वेस्टला प्रतिसाद देणे, मित्रांच्या फेसबुक वॉलवर लिहिणे, बर्थ डे रिमाइंडर आणि मेसेज पाठवणे यासारख्या गोष्टी इंटरनेट किंवा डेटा कनेक्‍शनशिवाय करू शकतो. सर्व हॅण्डसेट्‌सवर ही सेवा वापरता येणार आहे. कोणत्याही मोबाईल कंपनीच्या ग्राहकाला ती वापरता येईल, असे कंपनीचे म्हणणे आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS