धोकादायक इमारतींतील कुटुंबांना लवकरच म्हाडाची नोटीस - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

धोकादायक इमारतींतील कुटुंबांना लवकरच म्हाडाची नोटीस

Share This
मुंबई  / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.com) मुंबई शहरातील अतिधोकादायक इमारतींची यादी काहीशी लांबल्यानंतर त्यातील कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम "म्हाडा‘ला अजूनही पूर्ण करता आलेले नाही. दोन दिवसांत या कुटुंबांना नोटिसा बजावून लवकरात लवकर म्हाडाच्या संक्रमण शिबिरांतील इमारतींत हलवले जाईल, असे मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
मंडळाने यंदा पावसाळापूर्व सर्वेक्षण करून आठ इमारती राहण्यास अतिधोकादायक जाहीर केल्या आहेत. त्यापैकी तीन इमारती गेल्या वर्षीच्या यादीतही होत्या. या आठ इमारतींत 215 कुटुंबे आहेत. आठपैकी दोन इमारतींच्या पुनर्विकासासाठी मंडळाने "ना हरकत‘ प्रमाणपत्र दिले आहे. त्यामुळे या रहिवाशांची अन्यत्र व्यवस्था करण्याची जबाबदारी विकसकांची आहे. मंडळाकडून 21 कुटुंबांची संक्रमण शिबिरातील इमारतींत पर्यायी व्यवस्था केली जाणार आहे. त्या दृष्टीने या कुटुंबांना घरे रिकामी करण्यासाठी दोन दिवसांत नोटिसा बजावल्या जातील. त्याला त्यांनी प्रतिसाद दिला नाही, तर कायद्यानुसार कारवाई करावी लागेल. पोलिस बळाचा वापर करून ही घरे रिकामी केली जातील, असे मंडळाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages