हलगर्जीपणा करणार्‍या कंत्राटदाराला सात लाखांचा दंड - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 June 2014

हलगर्जीपणा करणार्‍या कंत्राटदाराला सात लाखांचा दंड

मुंबई  / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.comमुंबईतील नाल्यांची सफाई २९ मेपर्यंत ९५ टक्के झाल्याचा दावा पालिकेने केला असताना तो फोल असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी काही नाल्यांची पाहणी करून सिद्ध केल्यानंतर पालिकेने रफीकनगर नाल्याच्या सफाई कामात हलगर्जीपणा करणार्‍या कंत्राटदार भावेश याला सात लाख रुपयांचा दंड ठोठावला असून, पालिकेचे उपअभियंता पटेल यांचीही हलगर्जीपणाबद्दल बदली केली आहे. 
आंबेरकर यांनी सोमवारी गोवंडी, चेंबूर परिसरातील रफीकनगरसह अन्य काही नाल्यांची अचानक पाहणी केली होती. त्यानंतर त्यांनी पालिकेचा नालेसफाई ९५ टक्के झाल्याचा दावा चुकीचा आहे, असे सांगितले होते. त्यानंतर पालिका प्रशासनाने कंत्राटदारावर दंडात्मक आणि उपअभियंत्यावर बदलीची कारवाई केली.

Post Bottom Ad

JPN NEWS