दुर्लक्षित बेस्ट कर्मचारी ! - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

दुर्लक्षित बेस्ट कर्मचारी !

Share This
मुंबई महानगर पालिकेचा अंगीकृत उपक्रम असलेल्या बेस्टच्या बस खाली चिरडून एप्रिल २००६ ते डिसेंबर २०१३ या काळात ३१० मुंबईकरांचा मृत्यू झाला आहे. याच कालावधीमध्ये २५६ गंभीर स्वरूपाचे अपघात झाले असून ४००९ मध्यम स्वरूपाचे अपघात झाले आहेत. यामुळे बेस्ट मुंबईची दुसरी "लाईफलाईन" आहे कि "डेथलाईन" आहे असा प्रश्न हि आकडेवारी पाहून पडला आहे. 
बेस्ट बसखाली चिरडून सन २००६ - २००७ ते २०१२ - १३ या आर्थिक वर्षात २८८ लोकांचा मृत्यू झाला असून १६५ गंभीर स्वरूपाचे अपघात झाले आहेत तर ३६७७ मध्यम स्वरूपाचे अपघात झाले आहेत. सन २०१३ मध्ये एप्रिल ते डिसेंबर या कालावधीमध्ये २२ लोकांचा मृत्यू झाला असून ९१ गंभीर स्वरूपाचे अपघात झाले आहेत तर ३३२ मध्यम स्वरूपाचे अपघात झाले आहेत.

बसच्या झालेल्या अपघाताबाबत सन २००७-८ मध्ये ३४९ प्रकरणात ३१. ७४ लाख रुपये, सन २००८-९ मध्ये २१७ प्रकरणात ३६. लाख रुपये, सन २००९-१० मध्ये २६१ प्रकरणात ५०. १० लाख रुपये, सन २०१०-११ मध्ये २१७ प्रकरणात ३०. ०२ लाख रुपये, सन २०११-१२ मध्ये ३२९ प्रकरणात ७०. ०६ लाख रुपये, सन २०१२-१३ मध्ये २५१ प्रकरणात ४४.९६ लाख रुपये असे एकूण १६२४ प्रकरणात २६३.२७ लाख रुपयांचा मोबदला लोकांना देण्यात आल्याचे समजते. 

बेस्टचे सन एप्रिल २०१२ मध्ये १३९८ दावे प्रलंबित होते या प्रलंबित खटल्यामध्ये ४३१.५८ लाख रुपये बेस्टने मृत व अपघातग्रस्त लोकांना देणे बाकी आहे. सन २०१२ - १३ मध्ये १७९ दावे प्रलंबित असून त्याबदल्यात अपघातग्रस्तांना २३६.११ लाख रुपये बेस्टने देणे बाकी आहे. बेस्टने झालेल्या अपघातातील १६६ प्रकरणात अपघातग्रस्तानी ७५०.७३ लाख रुपयांचा दावा दाखल केला होता त्यापैकी ४३६.४५ लाख बेस्टने सबंतीत अपघातग्रस्ताना वाटप केले आहेत. 

बेस्ट कर्मचाऱ्यांकडून प्रवाशी व मुंबईकरांचा अपघात होत असताना सन २००६ -७ मध्ये १०१३, सन २००८-९ मध्ये ८५३, २००९-१० मध्ये ७४५, २०१०-११ मध्ये ७२९, २०११-१२ मध्ये ९२५, २०१२-१३ मध्ये ९७९ असे गेल्या सात वर्षात एकूण ६१२९ बेस्टचे कर्मचारी विविध कारणांमुळे जखमी झाले आहेत. या जखमी कामगारांना ३१६.८७ लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात आलेली आहे. अशी माहिती उपलब्ध झाली आहे. यामुळे वेस्ट कर्मचारी प्रचंड दबावाखाली काम करत आहेत असेच म्हणावे लागेल.  

भारतीय दंड विधानाच्या कलम ३०४ अ नुसार सन २०१२-१३ मध्ये बेस्ट कर्मचाऱ्यांवर ४१२ गुन्हे नोदवण्यात आले आहेत. त्यापैकी ५५ कामगारांना निर्दोष सोडण्यात आले आहे. ११ कामगारांना दोषी ठरवण्यात आले आहे. ८४ प्रकरणात कार्यवाही करण्यात आली असून २६२ प्रकरणे प्रलंबित आहेत. तर भारतीय दंड संहितेच्याच्या कलम २७९, २३७, २३८ व मोटार वाहन अधिनियमानुसार १२३४ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत त्यापैकी १७५ कामगारांना निर्दोष सोडण्यात आले आहे, १६ कामगारांना दोषी ठरवले आहे. १८२ कामगारांवर कारवाही करण्यात आली असून ८६१ प्रकरणे प्रलंबित आहे. 

एकीकडे प्रवाश्यांचे व मुंबईकर नागरिकांचे अपघात होत असताना दुसरीकडे खुद्द बेस्ट करमचाऱ्याचे सुद्धा मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. सध्या बेस्ट वर चार हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळत नाही. कर्मचाऱ्यांना चांगले आरामगृह, उपहारगृह याची सुविधा नाही. रोडवर असणारे प्रचंड ट्राफिक, दगदग यामधून बेस्ट कर्मचारी मुंबईकर नागरिकांना सेवा देण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा वेळी कर्मचाऱ्यांकडून चांगले अपघात होणार नाही, कर्मचारी चांगले काम करतील अशी अपेक्षा ठेवणे सुद्धा चुकीचेच ठरणार आहे. 

एकीकडे बेस्ट वाचावी म्हणून मुंबई महानगरपालिका लक्ष देत नसताना बेस्ट समिती मधील काही युनियनचे पदाधिकारी असलेले सदस्य त्यांच्या हिताच्या तेवढ्या मागण्या समिती पुढे करत असतात. कर्मचाऱ्यांकडून अपघात झाल्यावर आरडओरड केली जाते. परंतू आकडेवारी बघितल्यास बेस्टचे कर्मचारीच विवीध कारणांनी मोठ्या संखेने जखमी झालेले असतानाही कोणताही आवाज उचलण्यात येत नाही. अशा परिस्थितीमध्ये कर्मचाऱ्यांचे मानसिक संतुलन बिघडण्याची शक्यता जास्त असल्याने बेस्ट प्रशासन, महाव्यवस्थापक आणि बेस्ट समितीने वेळीच दखल घेण्याची गरज आहे. 

अजेयकुमार जाधव 
मो. ९९६९१९१३६३

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages