मुंबई / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.com) कँम्पा कोलामधील रहिवाशांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुदत उद्या संपत असून रहिवासी भयभित झाले आहेत. त्यांच्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री निर्णय घेवू शकतात. तो मार्ग आजही खुला आहे. त्यामुळे सरकारने मानवतेच्या दृष्टीने त्यांचा विचार करावा, अशी मागणी भाजपा अमदार ऍड आशिष शेलार यांनी आज विधान परिषदेत औचित्याच्या मुद्दयाव्दारे केली.
कँपाकोला रहिवाशांना मुंबई महापालिकेने घरे खाली करण्याची नोटीस बजावली आहे. उद्या त्यांची मुदत संपते आहे. याच इमारतीमधील एक रहिवाशी चक्रवती चावला यांचे काल निधन झाले. अशा प्रकारे या इमारतीमधील रहिवाशी भयभित आहेत.4 जूनला सर्वोच्च न्यायालयाने जे आदेश दिले त्यामध्ये न्यायालयाने मुख्यमंख्यंत्र्यांची ऑर्डर अंतिम मानली आहे.त्यामुळे मुख्यमंत्र्यांना याबाबत निर्णय घेण्यास एक संधी मिळू शकते. या इमारतीमधील 1774 चौरस मिटर क्षेत्रफळ अनधिकृत असताना 8 हजार चौरस मिटर पेक्षा जास्त क्षेत्रफळावर कारावाई करण्यात येणार आहे. ही बाब अयोग्य ठरू शकते. महापालिका डिसीआर 1967 नुसार रहिवाशांनी आपला प्रस्ताव सादर केला आहे. त्यामुळे रहिवाशांचा मानवतीच्या दृष्टीने सहानभूतीपूर्व शासनाने विचार करावा,अशी मागणी आमदार शेलार यांनी पुन्हा एकदा केली.
