प्रभाग क्रमांक १३५ मध्ये रविवारी पोटनिवडणूक - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

प्रभाग क्रमांक १३५ मध्ये रविवारी पोटनिवडणूक

Share This
मानखुर्द : येथील चित्ता कॅम्प परिसरातील प्रभाग क्रमांक १३५ च्या माजी नगरसेविकेचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्यामुळे या प्रभागात रविवारी पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. हा प्रभाग महिलांसाठी राखीव आहे. या प्रभागात एकूण ७ महिला उमेदवार रिंगणात असून, ५ अपक्ष, एक शेकाप आणि एक महायुती पुरस्कृत उमेदवार आहे. या प्रभागात अपक्ष उमेदवार निवडून येत असे; परंतु या वेळी शेकापच्या खैरुन्निसा हुसैन आणि महायुती पाठिंब्यावर लढणार्‍या जैबुन्निसा शेख ऊर्फ रुक्साना टिचर यांच्यात थेट लढत होणार असल्याची माहिती येथील स्वीकृत नगरसेवक शब्बीर खान यांनी दिली. हा प्रभाग महिलांसाठी राखीव होण्याआधी येथील माजी नगरसेवक मोहम्मद फारुखी यांनी आपल्या बहिणीला निवडणुकीसाठी उभे केले आहे. येथील मतदार कुणाच्या बाजूने कौल देणार याकडे विभागातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages